BB Marathi: भाऊच्या धक्क्यावर रितेश सगळ्यांचा क्लास घेणार; ‘या’ आठवड्यात कोणाची होणार शाळा

Bigg Boss Marathi Day 14: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनचा दुसरा भाऊचा (Ritesh Deshmukh) धक्कादेखील कमाल असणार आहे.

Bigg Boss Marathi (6)

Bigg Boss Marathi (6)

Bigg Boss Marathi Day 14: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनचा दुसरा भाऊचा (Ritesh Deshmukh) धक्कादेखील कमाल असणार आहे. (Bigg Boss Marathi Day 14) आठवडाभर काही सदस्य निर्णय घेण्यात चुकले, तर काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर आपला रितेश भाऊ (Ritesh Deshmukh) या सर्व गोष्टींवर टीका करताना दिसणार आहे.


जान्हवीने दिली धमकी 

वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्या मध्ये जोरदार भांडण झाले. तेव्हा वर्षा या जान्हवीला कळसूत्री बाहुली असे बोलताना पाहायला मिळाले. ते ऐकून जान्हवी आणखी चिडते ती वर्षा यांना धमकी देते, ‘ताई तुम्ही माझ्या नादी लागू नका. मी तुमचा आदर ठेवून बोलते. माझ तोंड खोलू नका, माझ्या नादी लागू नको.’ यावर वर्षा या लगेच कालचा एक विषय काढताना बघायला मिळाले. जान्हवीला तिचा राग अनावर होतो. ती इथेच थांबत नाही. ती वाटेल वर्षा यांना बोलताना दिसत आहे.

जान्हवीने केला वर्षा यांचा अपमान

वर्षा या जान्हवीला माझ्या नादी लागायचे नाही असे काय बोलताना पाहायला मिळाले आहे? त्यावर जान्हवीने माझ्या नादी लागू नका असे पुन्हा बोलते. त्यानंतर वर्षा या एकदम हळू न चिडता सर्व काही बोलताना दिसत आहेत. परंतु जान्हवी काही ऐकायला तयार नसते ती वाटेल तसे बोलत असते. ती वर्षा ताईंना तुमची ही घाणेरडी अॅक्टींग माझ्यासमोर करु नका असे बोली आहे. त्यावर वर्षा ताई लगेच ‘असं कसं मला अॅक्टिंगसाठी शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तो ही तीन वेळा’ असे बोलत आहेत. ते ऐकून जान्हवी अक्षरश: तिच्या मर्यादा ओलांडताना बघायला मिळाली आहे. ‘आता त्यांना पश्चाताप होत असेल ह्यांना का दिला आपण तो पुरस्कार. किती चांगले चांगले अभिनेते आहेत बाहेर. त्यांना नाही मिळाला आणि तुम्हाला मिळाला’ असे जान्हवी बोलताना दिसली आहे.

Bigg Boss Marathi: तोंडाला तोंड लागतंय, धनंजय आणि छोट्या पुढारीमध्ये पडली वादाची ठिणगी

रितेश भाऊ घेणार सगळ्यांची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा दुसरा भाऊचा धक्का देखील धमाल राहणार आहे. आठवडाभर काही सदस्य निर्णय घेण्यात चुकले, तर काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर आपला रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर हल्लाबोल करताना पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version