Download App

BB Marathi : आज सुटणार ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’; कोण होणार बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन?

Bigg Boss Marathi Season 5 : आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील घराचा पहिला कॅप्टन कोण होणार, हे आता ठरणार आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसी कार्य आयोजित करण्यात आलं आहे. (Bigg Boss Marathi Season 5) घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. (Bigg Boss Marathi ) अशीच एक स्पर्धा आज रात्री ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या एपिसोडमध्ये रंगलेली पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi Season 5 Captaincy Task) ज्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क आयोजित करण्यात येईल.


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोवरुन ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज घरात ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये धडपड करताना दिसून येत आहेत. या बुलेट ट्रेनमध्ये एक सीटसाठी रेटारेटी होतानादेखील पाहायला मिळत आहे. नव्या सीझनला घराचा पहिला कॅप्टन मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन होणं अत्यंत महत्वाचे मानले जाते. आता बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आजचा भाग विशेष रंजक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसीचा टास्क पार पडणार आहे. यामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या एपिसोडमध्ये आता घरातील सदस्यांसाठी स्पर्धा चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. घराचा कॅप्टन बनण्यासाठी हा टास्क जिंकावा लागणार आहे.

follow us