Download App

अरबाजच्या फीलिंग झाल्या आहेत हर्ट; भांडी फोडून करतोय कल्ला, बिग बॉस’च्या घरात मोठा राडा

Bigg Boss Marathi Season 5: अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार वादावादी झाली असून अरबाजने या रागातून घरातील वस्तूंची आदळाआपट केली आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 31 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात महिन्याभरातच नात्यांची चक्र फिरली आहेत. (Bigg Boss Marathi New Season) कालच्या भागात बिग बॉसने (Bigg Boss Marathi) घरातील सदस्यांना जोंड्यांच्या बेडीत अडकवलं असून निक्की (Nikki Tamboli) आणि अभिजीतची (Abhijeet Sawant) एक जोडी आहे. आता या जोडीमुळे निक्की आणि अभिजीतची मैत्री मुळेल का? असा प्रश्न बिग बॉसप्रेमींना पडला आहे. निक्की आणि अभिजीतची दिल दोस्ती दुनियादारी मात्र अरबाजला (Arbaz Patel) मात्र चांगलच खटकत आहे.


बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत पोळी बनवताना दिसत आहे. दरम्यान निक्की हसल्यामुळे अरबाज तिला “हसत आहेस”, असं म्हणत हातात असलेली भांडी फोडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावर निक्की म्हणते, “काय आहे याचा बालीशपणा. तुला माझी गरज नाही आहे”. यावर अरबाज म्हणतो,”नाही आहे… आता हे पाहून तर अजिबातच नाही”. अरबाजला उत्तर देत निक्की म्हणते,”हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत”.

निक्की आणि अभिजीतची मैत्री पाहणं अरबाजला सहन होत नाही. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो दुखावला आहे. भांडी फोडून, सामान आपटून तो कल्ला करताना आजच्या भागात दिसून येईल. संतापलेल्या अरबाजला घरातील इतर सदस्य शांत करताना दिसून येतील.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात,”अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?”. त्यावर अभिजीत म्हणतो,”हम दोनो”. त्यानंतर घरात एकच हशा पिकतो. अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते,”आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात”. त्यावर अभिजीत ‘कुछ तू लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची

बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात कालच भाऊचा धक्का पार पडला. रितेश भाऊच्या सांगन्याने घरातल्या सदस्यानंवर किती फरक पडतो हे पाहाणे महत्त्वाचे ठरले. ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

follow us