Download App

Bigg Boss Marathi: ‘ढगाला लागली कळं…’, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज पावसात भिजणार

Bigg Boss Marathi New Season Day 41: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरातील ( Bigg Boss Marathi) सदस्य पावसात भिजताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 41: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रत्येक सदस्य नेहमीच आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. (Bigg Boss Marathi New Season) कालच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घराचा नवा कॅप्टन झालेला पाहायला मिळालं. सूरजच्या झापुक झुपुक स्टाईलने सर्वांचं काळीज जिंकलंय. (Bigg Boss Marathi New Promo) आता आजच्या भागात घरातील सदस्य पावसात भिजताना दिसणार आहेत.


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील (Bigg Boss Marathi New Promo) सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये जमले आहेत. तर बिग बॉस म्हणत आहेत,”आज सर्वांना पावसात भिजता येईल याची व्यवस्था केली आहे”. त्यानंतर घरातील सर्वच सदस्य ‘ढगाला लागली कळं’ या गाण्यावर रेन डान्स करताना दिसत आहेत. सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

पंढरी शेवटचं पावसात कधी भिजलात? बिग बॉसचा पॅडी दादाला सवाल

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात बिग बॉस पॅडी दादांना विचारत आहेत,”पंढरी शेवटचं पावसात कधी भिजला होतात?”. त्यावर पॅडी म्हणतो,”खूप वर्ष झाली”. बिग बॉस पुढे व. पू, काळेंचं एक वाक्य ऐकवतात,”पाऊस अनेक ठिकाणी एकाचवेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं”. तसेच पावसावर चार्ली चॅप्लिन म्हणतात,”मला पावसात भिजायला आवडतं. कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत”. त्यानंतर बिग बॉस पुढे पावसात भिजता येण्याची व्यवस्था केली असल्याचं सदस्यांना सांगतात.

Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

“मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला

बिग बॉस मराठी’च्या घराचा नवा कॅप्टन गोलीगत सूरज चव्हाण झाला आहे. सूरज कॅप्टन झाल्याने घरातील सर्व सदस्य आनंदी आहेत. कॅप्टन सूरज आज कॅप्टनसीबद्दल अंकिता, निक्की, अरबाज, वैभवसोबत चर्चा करताना दिसणार आहे. दरम्यान “मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”, असं म्हणताना तो दिसून येईल.

सूरज निक्कीला म्हणतोय,”तू काही चुका करू नकोस”. त्यावर निक्की त्याला नाही करणार असं म्हणते. निक्की म्हणते,”तुझ्या कॅप्टनसीसाठी माझा सगळ्यात मोठा पाठिंबा होता”. तर अंकिता मध्येच म्हणते,”मी मात्र झोपणार”. त्यावर सूरज म्हणतो,”तुला विनंती करतो झोपू नकोस”. अंकिता पुढे म्हणते,”मला बुक्कीत टेंगुळ दिलं आहेस”. सूरज म्हणतो,”मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”.

follow us