Download App

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आर्या- अभिजीत खेळले मजेदार रॅपिड फायर

Bigg Boss Marathi Season 5 Day 44 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5 ) घरात फक्त गेम नाहीतर मज्जा-मस्ती देखील केली जात आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 44 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5 ) घरात फक्त गेम नाहीतर मज्जा-मस्ती देखील केली जात आहे. (Bigg Boss Marathi ) कोणी आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतं तर कोणी आपल्या विनोदांनी रसिकांना पोट धरून हसायला भाग पाडतं . हीच मज्जा आता आर्या,(Arya Jadhav) अभिजीत (Abhijeet Sawant) आणि DP दादांनी (DP Dada) केली आहे.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या UNSEEN UNDEKHA व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतंय की, आर्या, अभिजीत आणि डीपी दादा हे गार्डन एरियात स्कूटीवर बसून धमाल मस्ती करत आहेत. जिथे DP दादा आर्या आणि अभिजीतची ओळख प्रेक्षकांना कॅमेरासमोर करून देत म्हणतोय की,”बिग बॉस सीझन 5′ मध्ये तुमचं स्वागत आहेत. इथे आपल्याला सोबत दोन महान नग आहेत. ते म्हणजे आर्या जी एक रॅपर आहे. ती पेपरमध्ये गाणं रॅप करून आपल्याला ऐकवते आणि अभिजीत हे एक महानगायक आहेत.

आता या दोघांसोबत आपण रॅपिड फायर खेळणार आहोत. आपल्याला सोबत अभिजित आहेतच त्याचसोबत आर्यादेखील आहे. जिच्या अदांवर अख्ख्या महाराष्ट्र फिदा आहे पण वैभवचे काही लक्ष नाही.” यावर अंकिता त्यांना म्हणाली की ,”आजचा एपिसोड शूट झाला आहे”. मग अभिजीत म्हणाला की,” आम्ही हे फुटेजसाठी करत नाही आहोत. आणि जरी केली तरी काय वाईट आहे. या सगळ्यावर DP दादा म्हणाले की ,”‘जली को आग कहते है बुजी को राख कहते है और जो हम पे जले उसको अंकिता वालावलकर कहते है’.

‘संग्रामने पहिल्याच दिवशी घेतलाय निक्कीसोबत पंगा’

बिग बॉस मराठी’च्या घरात आज संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. त्याला घरातल्या पहिल्या दिवसापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्याचा पहिला दिवसच टास्कपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी टास्कमध्ये सदस्यांसोबत वाद घालताना संग्राम दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज जादुई विहिरीत कोण पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi: सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे पोरगी; गोलीगत लाजत म्हणतोय

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेईल.

follow us