Bigg Boss Marathi: सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे पोरगी; गोलीगत लाजत म्हणतोय…

Bigg Boss Marathi: सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे पोरगी; गोलीगत लाजत म्हणतोय…

Bigg Boss Marathi Season 5 Day 44: ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात (Bigg Boss Marathi Season 5) घरात संग्राम चौगुले (Sangram Chougule) एन्ट्री घेताना दिसणार आहे. पण त्याआधी सूरज (Suraj Chavan) मात्र त्याच्या अपेक्षांबद्दल बोलताना दिसून येईल. वाइल्ड कार्ड (Wild Card Entry) म्हणून सूरजला घरात एक मुलगी यायला हवी आहे. त्यामुळे घरातील सदस्य त्याची चांगलीच खेचखेची करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) आजच्या भागात वैभव अंकिताला (Ankita) म्हणतोय की सूरज बोलतोय,”कोणीतरी मुलगी आली तर मजाच आहे”. त्यावर अंकिता सूरजला म्हणते, “तू चुकीचा गेम समजत आहेस..थंड घे”. त्यावर निक्की मात्र सूरजला पाठिंबा देते. दरम्यान प्रेक्षकांना लाजतानाचा सूरज पाहायला मिळेल. डीपी दादा (DP Dada) सूरजला आश्वासन देतो की,”घरात मुलगी आली तर तिच्यासोबत तुझं प्रेमप्रकरण मी पूर्ण करून देईल”.

‘मी येतोय…’

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज फळ्यावर ‘मी येतोय’ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी येतोय हे नक्की कोणी लिहिलं आहे आणि कोणाबद्दल लिहिलं आहे हे जाणून घेण्याची सदस्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मी येतोय म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

संग्रामने पहिल्याच दिवशी घेतलाय निक्कीसोबत पंगा

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत, “या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की (Nikki Tamboli) विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेईल.

Bigg Boss Marathi: ‘घोडा लावायचा नाही रे’, सुरजच्या लग्नाचे घनश्यामला टेन्शन

कोण आहे संग्राम चौगुले?

बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याने दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube