Download App

Bigg Boss Marathi: ‘तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय’; अभिजीतने निक्कीला सुनावलं

Bigg Boss Marathi Season 5 Day 59 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ (Bigg Boss Marathi Season 5) आता अंतिम टप्प्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 59 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ (Bigg Boss Marathi Season 5) आता अंतिम टप्प्यात आला आहे. (Bigg Boss Marathi) त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. दरम्यान आजच्या भागात अभिजीत (Abhijeet Sawant) निक्कीला (Nikki Tamboli) सुनावताना दिसणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की आरडाओरडा करत म्हणतेय,”अभिजीतचे चाहत्यांची इच्छा होती की तो कॅप्टन बनेल. पण याने अंकिताला बनवलं”. त्यावर निक्कीला उत्तर देत अभिजीत म्हणतोय,”आमच्यात लोकशाही आहे. तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय”.

निक्की पुढे म्हणतेय,”हे सगळं करुन तुला मला वाईट ठरवायचं असेल… तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको”. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. काही दिवसांतच हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.

‘बिग बॉसने’ दिला नवा टास्क

बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य आता आणखी जोमाने खेळण्यास सज्ज झाले आहे. वाद, भांडणं करण्यासोबत काही सदस्यांनी नाती देखील बनवली. अरबाज सारखा स्ट्राँग सदस्य घराच्या बाहेर गेल्याने घरातले बाकीचे सदस्य अजून चांगल्या पद्धतीने खेळू लागले आहेत.

Bigg Boss Marathi: ‘अशा बॉडीचा उपयोग काय?’, नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात तुम्ही पाहू शकता की, बिग बॉसने दिलेल्या नव्या टास्कमध्ये तुम्हाला दिसेल की सगळे सदस्य आता स्वतःचा गेम खेळत आहेत. प्रोमोच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की,”बिग बॉसने सांगितले, ज्या सदयांचे घरात ठाम मतं नाहीत त्यांना तुम्ही टार्गेट करायचे आहे.

follow us