Download App

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनिल थत्तेंच्या विधानांनी उडणार खडबळ

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : 'बिग बॉस मराठी'चा हा वीकेंड खूप (Bigg Boss Marathi Season 5 ) स्पेशल असणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : ‘बिग बॉस मराठी’चा हा वीकेंड खूप (Bigg Boss Marathi Season 5 ) स्पेशल असणार आहे. आजच्या भागात राखी सावंत (Rakhi Sawant), अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आणि अनिल थट्टे (Anil Thatte) हजेरी लावणार आहेत. अनिल थत्तेंच्या विधानांनी आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकच खळबळ उडणार आहे. त्यामुळे आज घरात एकच कल्ला होणार आहे.


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आता घरात येत आहे अशी एक व्यक्ती ज्यांच्या विधानांनी नेहमीच खडबळ उडते”. पुढे अनिल थट्टे म्हणतात,”वर्षा ताई वगैरे असं काही मी म्हणणार नाही. तरुणपणातील ड्रीम गर्ल ही होती. निक्की तू यूनिक आहेस. तुझ्याशिवाय आम्ही ‘बिग बॉस’ची कल्पना करू शकत नाही”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनिल थत्तेंची एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एकंदरीतच आजचा भाग खूप खास असणार आहे. आजच्या या विशेष भागाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत बिचुकलेला राग अनावर

अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे. बिचुकले म्हणतोय,”डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार”. अभिजीतच्या एन्ट्रीला ‘मैं हूँ डॉन” हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.

Bigg Boss Marathi : घरात अभिजीत बिचुकलेला राग अनावर; सदस्यांचा करणार पाणउतारा

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसणार आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतोय,”बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला…मी काहीही फोडू शकतो या घरातलं”.

follow us