Abhijit Bichukale यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! ‘महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट, आता…

Abhijit Bichukale यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! ‘महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट, आता…

सातारा : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवलेले आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी मिळवत असलेले बिग बॉस (Big boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) पुन्हा एकदा राजकारणात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय.

पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यभरातील तमाम महिलावर्गाकडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत दिली. मात्र महिला वर्ग फक्त प्रवास करत नाही तर संपूर्ण कुटुंबाकरिता स्वयंपाक करतात आणि घर सांभाळतात. त्यांनी आपल्या पत्रातून सिलिंडरच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे, तसेच सिलिंडरच्या किंमतीत ५० टक्के सवलत द्या, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय.

Post Account Scam : पुण्यात पोस्ट खात्यात कोट्यावधीचा घोटाळा; तीन पोस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र

अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘महिला वर्गाला एस टी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली त्याबाबत सरकारचं मनापासून अभिनंदन. याचा आनंद आहे. पण खऱ्या अर्थाने महिलांना आणि सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जिव्हाळ्याचा विषय असेल तर तो राज्यातील गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली ती कमी करावी.

Sanjay Raut : ‘हा’ असेल मालेगावचा पुढचा आमदार; राऊतांनी सांगूनच टाकले

नवीन मराठी वर्षानिमित्त नागरिकांसाठी काही चांगले करायचे असल्यास सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ही विशेष सूचना करत असल्याचे त्यांनी यावेळी पत्रात म्हणले आहे. महाराष्ट्र राज्यातील गॅस सिलिंडरची किंमत आपण ५०० रुपये इतकी करावी. राज्यशासनाच्या कोट्यातून सिलिंडरच्या किंमतीत ५० टक्के अनुदान तथा सवलत जाहीर करावी म्हणजेच खऱ्या अर्थाने गरीबांची तसेच महिलांची दक्षता घेणारे हे सरकार आहे, असे म्हणता येईल असल्याचे यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री महिला असेल ही भूमिका प्रथम अभिजित बिचुकले यांनी मांडली होती. यानंतर लोकं माझी कॉपी करायला लागले, असा टोला बिचुकले यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर कॉपी करणाऱ्यांवर खोचक टीकाही त्यांनी केली. म्हणाले ‘मी बैल आहे ,माझी कॉपी कोणी करु नये. बेडकानं बैल व्हायचं पाहू नये, असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी यावेळी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube