Download App

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात अभिजीतने मांडले सुरज विषयी स्पष्ट मत

Bigg Boss Marathi Season 5 Day 66 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी बिग बॉसने नवा टास्क दिला होता.

Bigg Boss Marathi Season 5 Day 66 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी बिग बॉसने नवा टास्क (New Task) दिला होता. (Bigg Boss Marathi Season 5) घरातली सर्व सदस्यांनी दिलेला टास्क उत्तमरीत्या पार पाडला. जसे दिवस जात आहेत तसे सर्व सदस्यांमध्ये आपल्याला स्पर्धा दिसत आहे.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की DP दादा (DP Dada), सुरज (Suraj Chavan) आणि अभिजित गार्डन (Abhijeet Sawant ) एरियात बसले असताना DP दादा अभिजितला म्हणाले,” तू मला सांग की, घरामध्ये वावरणे, कोणत्या गोष्टीमध्ये ठाम पणे मुद्दे मांडणे, डिसिजन मेकिंग, एखाद्या गोष्टीमध्ये भाग घेणे, टास्क खेळताना स्ट्रॅटर्जी आखणे. या सगळ्यांमध्ये मी खरच 1 लाखाच्या योग्यतेचा आहे का..? आणि सुरज ६ लाखांच्या योग्यतेचा आहे का..? यावर अंकीता अभिजितला म्हणाली,” तुला सुरज या योग्य वाटतो का..? या सगळया गोष्टींमध्ये आम्हाला तू सुरजला बसवून दाखव.

यावर अभिजित म्हणाला,” मला वाटते की, सुरजमध्ये खूप बदल झाला आहे.त्याने प्रत्येक वेळी टास्कमध्ये 100 टक्के देऊन पुर्ण जिद्दीने गेम खेळला आहे.तुम्ही कितीही बोला की, सुरजला कळत नाही. पण त्याने प्रत्येक टास्क पूर्ण केला आहे. शेवटच्या टास्कमध्ये पण त्याने जास्त झेंडे आणले होते.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात आज ठरणार सदस्यांची किंमत

स्पेशल गेस्ट शिव ठाकरे

आज घरात स्पेशल गेस्ट म्हणून ‘आपला माणूस’ शिव ठाकरे येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरेसोबत”. शिव ठाकरेने आपल्या एन्ट्रीने घरात एक वेगळाच उत्साह आणला आहे. बिग बॉस मराठीच्या एका पर्वाचा शिव ठाकरे विजेता होता. आता शेवटच्या आठवड्यात तो सदस्यांना काय टिप्स देतो हे पाहावे लागेल.

प्रोमोमध्ये शिव म्हणतोय,”अतिशय भव्य-दिव्य हे सेलिब्रेशन असेल. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं ग्रँड सेलिब्रेशन होईल. तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट!”. आता शिव काय हटके सेलिब्रेशन करणार हे पाहावे लागेल.

follow us