Download App

Bigg Boss Marathi: ‘फार हसू येतंय का?’; ‘बिग बॉस’ने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

Bigg Boss Marathi New Season Day 34: 'बिग बॉस मराठी'च्या ( Bigg Boss Marathi) घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 34: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. (Bigg Boss Marathi ) या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदलली. (Bigg Boss Marathi New Season) त्यामुळे टीमदेखील बदलल्या. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. (Bigg Boss Marathi New Promo) पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या. आजच्या भागात डीपी दादा (DP Dada) आणि अंकिताची (Ankita) बिग बॉस फिरकी घेताना दिसणार आहेत.


‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य ‘बिग बॉस’ काय आदेश देणार हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येतं. त्यावर बिग बॉस म्हणतात,”धनंजय, अंकिता फार हसू येतंय… मलाही सांगा हा जोक”. त्यावर डीपी दादा म्हणतो,”बिग बॉस काही जोक नव्हता”. पुढे बिग बॉस म्हणतात,”मी सांगू का आपल्या मनात काय होतं…जाऊदे”.

निक्की करतेय अंकिताची नक्कल

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की अंकिताची नक्कल करताना दिसणार आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय,”काल अंकिता घाबरली होती. डीपीला सांगत होती नॉमिनेटेड आहे. मला तर म्हणत होती,”तुझ्या नॉमिनेशनची मला भीती वाटत नाही. नॉमिनेट झाल्यानंतर मी तिचं वेगळं रूप पाहिलं. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत असल्याने अंकिता घाबरली आहे”. पुढे अंकिता येते आणि म्हणते,”मला बोलतेय…डायरेक्ट बोल की”. तर निक्की, अभिजीत, वैभव, अरबाज यांच्यात जेवणावरुन भांडण झालेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi: कोण कोणाला करणार फेव्हर, कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण ठरणार विनर?

कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण ठरणार विनर?

बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन पाच आठवडे होत आहेत. पण तरीही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. या आठवड्यातील टास्कने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण विजेता होणार आणि कॅप्टनसी मिळवण्यासाठी कोण कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कॅप्टनसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची”. त्यानंतर घरातील इतर सदस्य म्हणजेच जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी का योग्य आहेत हे सांगताना दिसत आहेत. पण त्यांच्यात बहुमत होत नसल्याने बिग बॉस बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगतात.

follow us