Download App

Bigg Boss: नवाजचं घर सोडून आलिया सिद्दकी थेट बिग बॉसच्या दारात; दिसणार 12 दिग्गज चेहरे

Bigg Boss OTT 2 Contestants: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) हा लोकप्रिय कार्यक्रम आजपासून चाहत्यांना भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, (Salman Khan) याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) हा कार्यक्रम चाहत्यांना आता जिओ सिनेमावर बघू शकणार आहेत. आता निर्मात्यांनी या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. (ENTERTAINMENT) तर स्पर्धकांबद्दल जाणून घ्या.

आलिया आणि नवाजुद्दीन 2010 साली लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. वर्षभरातच त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी 2004 साली आलिया आणि नवाजुद्दीन रिलेशनमध्ये होते. त्यावेळीदेखील त्यांच्यात वाद व्हायचे. लग्नाआधी अनेकदा त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

अविनाश सचदेव : ‘छोटी बहू’ आणि ‘इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अविनाश सचदेव

पलक पुरसवानी : अविनाश सचदेवची गर्लफ्रेंड पलक पुरसवानी देखील ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी होणार आहे. पलक ही मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे.

पुनीत कुमार :पुनीत कुमार हा सुपरस्टार आहे.

बेबिका धुर्वे : अभिनेत्री बेबिका धुर्वे नुकतीच ‘भाग्य लक्ष्मी’ या मालिकेत दिसली होती.

फलक नाज : अभिनेत्री फलक नाज देखील ‘बिग बॉस ओटीटी 2’चा भाग असणार आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसाची कमाई ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल !

श्रुती सिन्हा : ‘Splitsvilla 11’ची विजेती श्रुती सिन्हा ‘रोडीज’ आणि ‘एस ऑफ स्पेस’ गाजवली  आहे.

मनीषा रानी : ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

जेद हदीद : मॉडेल जेद हदीद देखील ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी झाला आहे.

आलिया सिद्दीकी : बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी

अभिषेक मल्हान : अभिषेक मल्हान एक लोकप्रिय युट्यूबर आहे.

आकांक्षा पुरी : अभिनेत्री आकांक्षा पुरी पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ गाजवण्यासाठी सज्ज आहे. आकांक्षाने छोट्या पडद्यासह रुपेरी पडदादेखील गाजवला आहे.

जिया शंकर : जिया शंकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘मेरी हानिकारक बीवी’ या मालिकेतील तिची डॉ. इरावतीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Tags

follow us