Satish Kaushik Death : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केल्याचा दावा होत आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचाही आरोप होत आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी जो विरोधाभास दिसत आहे. यावर त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर अनुपम खेर म्हणाले, की सब बकवास है, सब गलत है. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.
Live Blog | सत्तासंघर्षावर आजची सुनावणी संपली, दिवसभरात काय घडलं?
अशा परिस्थितीत फक्त काहीतरी सनसनी निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक सतीश कौशिक यांनी खूप चांगले जीवन व्यतित केले. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूबाबत जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्यात काहीच तथ्य नाही असे मला वाटते.
दरम्यान, एका महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देत 15 कोटींच्या वादातून सतीश कौशिकची हत्या झाल्याचा दावा केला होता. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे देण्यासाठी पैसे नसल्याने या वादातून ही हत्या घडली असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….
ETimes च्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत सतीश कौशिकच्या अनैसर्गिक मृत्यूची शक्यता नाकारली आहे. महिलेने दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पडताळणी होऊ शकली नाही, असेही सूत्राने स्पष्ट केले. परंतु सूत्राने असेही सांगितले की या कथित तक्रारीवर अंतिम निर्णय येणे बाकी आहे. या तपासात काय तथ्य बाहेर येते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.