Hina Khan Apologies Hindus On Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. सर्वजण या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान आता या घटनेवर टीव्हीवरील ‘अक्षरा’ म्हणजेच इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) देखील वक्तव्य केलंय. हिना 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम ( Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरमध्ये होती. तिने तिच्या चाहत्यांसोबत काश्मीरची सुंदर झलक शेअर केली.
पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26 निष्पाप लोकांबद्दल हिना खान खूप दुःखी आहे. अभिनेत्री स्वतः मुस्लिम धर्माची आहे आणि मुस्लिम असल्याने तिने या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्व हिंदू आणि भारतीयांची माफी मागितली (Hina Khan Apologies Hindus) आहे. हिना खानने इंस्टाग्रामवर एक लांब पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये हिनाने लिहिलंय की, मुस्लिम असल्याने मी माझ्या सर्व हिंदू आणि माझ्या भारतीयांची माफी मागते. एक भारतीय म्हणून हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्याबद्दल मी दु:खी आहे. एक मुस्लिम म्हणून मी खूप दु:खी (Bollywood Actress) आहे. पहलगाममध्ये जे घडलंय, ते मी विसरू शकत नाही. या घटनेचा माझ्यावर आणि माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम झालय. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांचे हे दुःख आहे. ही वेदना प्रत्येक भारतीयाला होत आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, अशी प्रार्थना देखील हिना खाने केली आहे.
या घटनेचा निषेध करताना तिने पुढे लिहिलंय की, मी या घटनेचा निषेध करते. ज्या लोकांनी हे कृत्य केलंय, त्यांचा मला तिरस्कार आहे. काही मुस्लिमांच्या कृत्याची मला लाज वाटते. मी विनंती करते, की आम्हाला वेगळं करू नये. आपण सर्वजण भारताला आपले घर आणि मातृभूमी म्हणतो. जर आपण एकमेकांशी लढलो, तर आपण तेच करू जे त्यांना हवे आहे. आपल्यात फूट पाडून ते आपल्याला लढवत राहतील, असं देखील त्यांनी म्हटलंय.
सूर्य आग ओकतोय! विदर्भ, मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हिना खानने लिहिलंय की, एक भारतीय म्हणून मी माझ्या देशासोबत, सुरक्षा दलांसोबत उभी आहे. मी माझ्या देशाचे समर्थन करते. एक भारतीय म्हणून माझा असा विश्वास आहे की, माझ्या सुंदर देशात सर्व धर्म सुरक्षित आणि समान आहेत. बदला घेण्याच्या माझ्या देशाच्या संकल्पाला मी बिनशर्त पाठिंबा देते. याबद्दल कोणताही प्रश्न नाही. तिने पोस्टमध्ये शेवटी म्हटलंय की, मला एक भारतीय मुस्लिम माणूस न्याय हवा आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला पाठिंबा दिला पाहिजे. आपण एक लोक म्हणून एकत्र आले पाहिजे. आपण प्रथम भारतीय आहोत. जय हिंद!’.