Download App

‘मी मर्यादा विसरलो होतो…’, अनुराग कश्यपने ब्राम्हण समुदायासंदर्भातील वादग्रस्त विधानावर मागितली माफी

Anurag Kashyap Apology To Brahmin Community : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap) आता त्यांच्या जातीयवादी वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अलिकडेच त्यांनी फुले चित्रपटासंदर्भात ब्राह्मण समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता या संपूर्ण वादात, अनुराग कश्यपने एक सोशल मीडिया पोस्ट लिहून माफी मागितली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जातीवादी विधानानंतर गदारोळ सुरू आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

Video : जन्मांध मालाचा काळाकुट्ट प्रवास ते MPSC तील ‘नेत्रदीपक’ यश; प्रत्येकाने वाचावा असाच प्रवास

कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचा दावा देखील अनुराग कश्यप यांनी केलाय. दरम्यान, त्यांनी एक पोस्ट जारी करून ब्राह्मण समाजातील लोकांची माफी मागितली आहे. अनुराग कश्यप जातीवादी विधान करून प्रसिद्धीच्या झोतात आले (Anurag Kashyap Apology To Brahmin Community) होते. त्यानंतर ब्राह्मण समाजातील लोकांमध्ये चित्रपट निर्मात्याविरुद्ध संताप दिसून आला. सोशल मीडियावरही खूप विरोध होत आहे. आता अनुराग कश्यपने कबूल केलंय की, ते त्यांच्या मर्यादा विसरला होते. त्यांनी एक लांब पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे.

अनुराग कश्यप यांची पोस्ट

या पोस्टमध्ये अनुरागने लिहिलंय की, ‘रागाच्या भरात एकाला उत्तर देताना, मी माझ्या मर्यादा विसरलो. संपूर्ण ब्राह्मण समुदायाबद्दल वाईट बोललो. असा समाज, जिथे अनेक लोकांनी माझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते लोक अजूनही तिथे आहेत आणि खूप योगदान देतात. आज हे सर्व लोक माझ्यावर रागावले आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्य रागावले आहेत. मी ज्यांचा आदर करतो, ते देखील माझ्यावर रागावले आहेत. अनुराग कश्यप पुढे लिहितात, ‘मी असे काहीतरी बोललो जे विषयापासून दूर गेले. मला माफ करा. रागाच्या भरात मी एका वाईट कमेंटला उत्तर दिले जे मी करायला नको होते. अनुरागने पुढे अपशब्द वापरल्याबद्दल माफी मागितली. यासोबतच, त्यांनी भविष्यात असे न करण्याबद्दलही बोलले आहे.

अनुराग कश्यपने माफी मागितल्यामुळे आता काही लोकांनी कमेंट करून त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटकरी म्हणत आहेत की, तुम्ही याबद्दल आधीच विचार करायला हवा होता. तर काहींनी लिहिलंय की, माफी ही चुकीसाठी आहे, ते पाप आहे. त्याच वेळी, काही लोक त्याच्या समर्थनार्थ देखील पुढे आले आहेत. माफी मागितली ही खूप मोठी गोष्ट आहे. चूक मान्य करणे योग्य आहे, असं काहीजण म्हणत आहेत.

Video : जन्मांध मालाचा काळाकुट्ट प्रवास ते MPSC तील ‘नेत्रदीपक’ यश; प्रत्येकाने वाचावा असाच प्रवास

नेमका वाद काय?

फुले’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली होती, त्यानंतर अनुराग कश्यप संतापले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती की, धडक 2 या सिनेमाच्या स्क्रिनिंगबाबत सेन्सॉर बोर्डाने नरेंद्र मोदी यांनी भारतातील जातीव्यवस्था नष्ट केल्याचं म्हटलं होतं. याच आधारावर संतोष सिनेमा देखील रिलीज होऊ दिला नव्हता. आता ब्राह्मण फुले सिनेमावर आक्षेप घेत आहेत. भैय्या जर जातीव्यवस्थाच नष्ट झालीये, तर कशाचे ब्राह्मण? असं अनुराग कश्यपने म्हटलं होतं. त्यानंतर आता अनुराग कश्यपचा ब्राम्हण समाजासंदर्भातील माफीनामा समोर आलाय.

 

follow us