Anurag Kashyap चं वक्तव्य अन् अमृता सुभाष ट्रोल; तात्काळ स्पष्टीकरण देत मदतीलाही धावला

Anurag Kashyap चं वक्तव्य अन् अमृता सुभाष ट्रोल; तात्काळ स्पष्टीकरण देत मदतीलाही धावला

Amruta Subhash Troll due to Anurag Kashyap Statement : मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) हिने बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) दोन-तीन प्रोजेक्टमध्ये सोबत काम केलं आहे. ज्यामध्ये रमण राघव, चोक्ड आणि सेक्रेड गेम्स यांचा समावेश आहे. मात्र सध्या अनुराग कश्यपच्या एका वक्तव्यामुळे अमृता सुभाषला चांगलं ट्रोल केलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

नुकतीच बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप याने मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांचे पडद्यामागच्या काही किस्से सांगितले. तसेच हे कलाकार कशाप्रकारे आपल्याकडे अवास्तव मागण्या करतात. हे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

विखेंकडून ईव्हीएमवर शंका! ‘या’ कुटुंबाला पराभवच मान्य नाही, लंकेची सडकून टीका

यामध्येच त्याने मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषबद्दल बोलताना म्हटलं की, अमृताने आपल्या सोबत काम करताना तिच्या मॅनेजरकडून तिला सिंगल डोर व्हॅनिटी व्हॅन हवी आहे. असे सांगितलं होतं. अशी मागणी केल्याने मी तिला प्रोजेक्टमधून काढून टाकले. मात्र अनुराग कश्यपच्या याच वक्तव्यामुळे सध्या अमृता सुभाषला चांगलं ट्रोल केले जाते.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

जेव्हा अनुराग कश्यपला आपल्या या मुलाखतीतील वक्तव्यामुळे अमृता सुभाषला ट्रोल केलं जात असल्याचं कळालं. त्यावेळी त्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला माझं वक्तव्य पूर्ण न ऐकताच लोक अमृताला ट्रोल करत आहेत. कारण जेव्हा मी अमृताला काढून टाकलं त्यावेळी तिने मला फोन करून विचारलं तेव्हा मी तिला तिच्या मॅनेजरने माझ्याकडे केलेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवली.

मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याचा महाजनांचा प्रयत्न, पण मी जिवंत असेपर्यंत..; जरांगेची टीका

त्यावेळी कळालं की, या मागण्यांबाबत अमृताला काहीच कल्पना नव्हती. लगेचच तिने तिच्या मॅनेजरला याबाबत विचारणा केली होती. ह्या मागण्या तिच्या नव्हत्या तर तिच्या मॅनेजरकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकांनी अर्धवट माहिती असताना तिचा अशा प्रकारे ट्रोलिंग केलं जाऊ नये अशी विनंती अनुराग यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube