आमची युती भविष्यातील नांदी… शिवसेना अन् शरद पवारांच्या पक्षाच्या युतीनंतर प्रदेशाध्यक्ष शिंदेंचं मोठं विधान
Shashikant Shinde यांनी कुर्डूवाडी या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेसोबत थेट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या युतीनंतर मोठं विधान केलं आहे.
Shashikant Shinde statement on Shivsena and Ncp Sharad Pawar Party Alliance in Kurduwadi : सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्येच विविध ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या युत्या आणि आघाड्या होत आहेत. ज्यामध्ये नुकतंच कुर्डूवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत थेट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची युती झाली आहे. त्याचबरोबर या युतीनंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले शशिकांत शिंदे?
कुर्डूवाडीतील युतीनंतर शशिकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कुर्डूवाडी या ठिकाणी झालेली आमचीही युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी ठरू शकते. त्याचबरोबर राज्यात अनेक निवडणुका सुरू आहेत. मात्र सोलापूरच्या निवडणुकांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. असंही त्यांनी यावेळी म्हटलं, तर सांगोला आणि अनगर या नगरपालिकांच्या निवडणुकांवरून त्यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले काही लोक फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटणार?
राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात सुरु असणाऱ्या फोडाफाडीच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्याकडे देखील या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कुणाला कष्टाचं फळ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 27 नोव्हेंबरचं राशीभविष्य?
तर दुसरीकडे पालघर येथे एका जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा (BJP) नाव न घेता टीका केल्याने राज्यात आता पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर राज्यात लवकरच राजकीय भूकंप येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल 35 आमदार फुटणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाच्या मुखपत्र सामानामध्ये करण्यात आला आहे. याचबरोबर शिंदेंच्या नाराजीनाट्याचा तिसरा अंक देखील सुरु झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
