Download App

Box Office: बॉक्स ऑफिसवर फुटला ‘टायगर 3’चा बॉम्ब, तिसऱ्या दिवशी इतकी कमाई करत केला रेकॉर्ड सेट

Tiger 3 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. देशातच नव्हे तर जगभरात या सिनेमाची बोलबाला बघायला मिळत आहे. रिलीजच्या 3 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.


भाईजानसाठी यंदाची दिवाळी (Diwali 2023) खूप खास ठरली आहे. भाईजानच्या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात त्याचा ‘टायगर 3’ हा सिनेमा यशस्वी घौडदोड करत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने मोठा धमाका केली आहे.

‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची तुफान कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 42.50 कोटींचा गल्ला कमावला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 146.00 कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘टायगर 3’ हा भाईजानच्या करिअरमधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. थिएटरमध्ये पुन्हा-पुन्हा जात चाहते या सिनेमाचा आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमात किंग खानची देखील (Shah Rukh Khan) एक झलक बघायला मिळत आहे. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेमध्ये दिसत आहेत. एकंदरीतच ‘टायगर 3’च्या माध्यमातून चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.

Virendra Pradhan: सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, ‘मालिका अर्ध्यावर…’

‘टायगर 3’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने सांभाळली आहे. यशराज स्पाय यूनिवर्सच्या टायगर फ्रेंचायजीचा हा तिसरा धमाकेदार सिनेमा आहे. याअगोदर ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले होते. ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या 2 दिवसांतच 100 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली आहे. सिनेप्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे.

 

Tags

follow us