War 2 : इंटरनेटवर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे की अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आपली ब्लॉकबस्टर केसरिया म्युझिक टीम पुन्हा एकत्र आणत आहेत. यावेळी वॉर 2 (War 2) साठी, ज्यात ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे म्हणजेच, अयान, प्रीतम, अरिजीत सिंग आणि अमिताभ भट्टाचार्य पुन्हा एकत्र आले असून, नेटिझन्स यावर प्रचंड आनंद व्यक्त करत आहेत.
जेव्हा निर्माते यशराज फिल्म्स यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली, त्यांनी या माहितीची पुष्टी केली, मात्र गाण्याच्या लॉन्चची तारीख उघड केली नाही. एका सूत्राने सांगितले, “हे एक सुंदर गाणं आहे जे वॉर 2 मधील ऋतिक आणि कियाराच्या पात्रांमधील प्रेम दाखवतं. हे गाणं या आठवड्यात रिलीज होणार असून, वॉर 2 मधील प्रेक्षकांसमोर सादर होणारे पहिले गाणं असेल.”
पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, रेव्ह पार्टीची व्याख्या काय? अब्रुनुकसानीचा दावा करणार; एकनाथ खडसे
वॉर 2 ही एक भव्य अॅक्शन थियेट्रिकल फिल्म आहे जी 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वॉर 2 चा ट्रेलर इंटरनेटवर प्रचंड ब्लॉकबस्टर प्रतिसाद मिळवत आहे. ही एक खरीखुरी पॅन इंडिया फिल्म आहे, कारण या चित्रपटात देशातील दोन दिग्गज अभिनेते ऋतिक आणि एनटीआर एका जबरदस्त, रक्तरंजित संघर्षात आमने-सामने येणार आहेत.
Satyabhama चित्रपटाचा मनाला भिडणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट