Download App

मोठी बातमी! रणवीर अल्लाहबादिया-समय रैनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ranveer Allahbadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना यांच्यासह पाच जणांवर आसाम पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात

  • Written By: Last Updated:

Ranveer Allahbadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना (Samay Raina) यांच्यासह पाच जणांवर आसाम पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रणवीर अलाहाबादियासह आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) , जसप्रीत सिंग (Jaspreet Singh) , अपूर्व माखीजा (Apoorva Makhija) , समय रैना आणि इतरांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोच्या अलीकडील भागात ‘अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल’ स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांच्यावर आसाम पोलिसांनी कारवाई केली आहे.

माहितीनुसार, रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना यांच्यासह इतर कलाकारांवर शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि अश्लील चर्चांमध्ये सहभागी झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल यूट्यूबर्स आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्वा मखीजा आणि इतरांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत. अशी देखील माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिली आहे.

समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो वादात सापडला आहे. सध्या सोशल मीडियावर या शोबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकतंच रिलीज झालेल्या या शोच्या भागामध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणारे भाग दाखवण्यात आल्याने प्रेक्षक नाराज झाले आहे. सोशल मीडियावर या शोचा आता निषेध करण्यात येत आहे. तसेच प्रेक्षकांकडून रणवीर अलाहबादिया आणि अपूर्वा मुखिजा टीका करण्यात येत आहे.

BYD Sealion 7 पावरफुल बॅटरी अन् 567 किमीची रेंजसह 17 फेब्रुवारी रोजी होणार लाँच

follow us