Download App

Devendra Fadanvis : पत्नीनंतर फडणवीसही गाण्यात मागे नाही; महाशिवरात्रीनिमित्त फडणवीस लिखित ‘देवाधि देव’ रिलीज

Devendra Fadanvis New Song: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी अमृता फडणवीस नाही. तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे एका गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण फडणवीस यांनी लिहिलेलं ‘देवाधि देव’ हे गाणं महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्री रश्मिका म्हणाली – “हे पूर्वीपेक्षा मोठे..”

महाशिवरात्री निमित्त शिवभक्त आणि संगीत रसिकांसाठी टाइम्स म्युझिकने हे गाणं आणले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शब्दबद्ध केलेलं आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेले. हे गाणं शंकर महादेवन यांनीच गायलं आहे. तसेच या गाण्यांमध्ये अमृता फडणवीस यांनी गायलेल्या महामृत्युंजय मंत्राचा आहे समावेश आहे.

या गाण्याबद्दल बोलताना शंकर महादेवन यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुंदरपणे देवाधि देव हे गाणं लिहिलं. हे गाणं संगीतबद्ध करणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. तर फडणवीस यांनी देखील या गाण्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं माझ्या कुटुंबात लहानपणापासून शिवभक्त केले जाते.

BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम सुरु ठेवायचे की बंद करायचे?’ विचारण्याची नेत्यांवर वेळ

त्यामुळे माझ्यावर शिवपुराणातील कथांचा खूप प्रभाव आहे. ते गेल्यावर्षी प्रवास करताना मला या गाण्याची शब्द सुचले. आणि पत्नी अमृता यांनी हे गाणं होऊ शकतं असं सुचवलं. त्यानंतर मी शंकर महादेवन यांच्याशी बोलून ही कल्पना शेअर केली. त्याने देखील या गाण्याला संगीत देण्यास होकार दिला. महादेवन आणि अमृता यांनी या गाणं गायल्याचाही आपल्याला अत्यंत आनंद झाला असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज