BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम सुरु ठेवायचे की बंद करायचे?’ विचारण्याची नेत्यांवर वेळ
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पक्षाचे काम सुरु ठेवायचे आहे की बंद करायचे आहे? असा सवाल करत भारत राष्ट्र समितीच्या (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्रातील नेत्यांनी पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर (K Chandrashekhar Rao) राव यांना पत्र पाठविले आहे. भारत राष्ट्र समितीचे शेतकरी युनिटचे महाराष्ट्राचे प्रमुख माणिक कदम यांच्या नेतृत्वात नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली. यात हे पत्र लिहिण्याबाबत निर्णय झाला. (Maharashtra unit of the Bharat Rashtra Samithi (BRS) has sent out a letter to party chief K Chandrashekhar Rao)
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना माणिक कदम म्हणाले, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही. अशात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून प्रचार, उमेदवार, जागांबाबतची चर्चा अशा कोणत्याही गोष्टींची विचारणा झालेली नाही. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम सुरुच ठेवायचे आहे की बंद करायचे आहे याबाबत पक्षाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. आम्ही सगळेच अनभिज्ञ आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मी आघाडी सोबत पण आघाडी माझ्यासोबत नाहीच; मविआच्या बैठकीत असं का म्हणाले आंबेडकर?
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभव होण्यापूर्वी भारत राष्ट्र समितीने देशभर विस्ताराचे धोरण अवलंबिले होते. यात तेलंगणानंतर पक्षाने पहिले लक्ष्य महाराष्ट्रावर केंद्रीत केले होते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचे नियोजन केले. अनेक नेत्यांनी, माजी आमदार-खासदारांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. सर्वच विधानसभा मतदार संघात समन्वयक नेमले. समन्वयकांना टॅब आणि अन्य साधन सामग्री पुरवण्यात आली.
MVA Meeting Mumbai : लोकसभेसाठी मविआची 4 तास खलबतं; राऊतांनी सांगितलं आंबेडकरांच्या
याशिवाय राज्यात सुमारे 20 लाख 85 हजार पदसिद्ध पदाधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण केली. 17 हजार गावांमध्ये पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली. पदाधिकाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 ते 5 लाख रुपयांचा निधी वर्ग केला, राज्यात विभागनिहाय कार्यालय स्थापन करून पक्ष विस्ताराचे काम सुरु केले. सोलापूर, छत्रपती संभाजीनग आणि मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये उतरण्यास सुरुवात केली. मात्र तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होताच भारत राष्ट्र समितीचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे.