Download App

मलाही काम करताना तिच्याकडून उर्जा मिळाली, मांजेकरांनी केलं ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीचं कौतुक

नाटक करताना मी नफा-तोट्याचा विचार करत नाही. कारण, नाटकातून मिळणारा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. - महेश मांजेरकर

  • Written By: Last Updated:

Mahesh Manjrekar : बहुचर्तित देवमाणूस (Devmanus) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) याच्या प्रमुख भूमिका आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सहकलाकार असलेल्या रेणुका शहाणे यांच्या कामाचं तोंडभरून कौतूक केलं.

Sanjana Ghadi : मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का! संजना घाडींचा शिंदे गटात प्रवेश 

मांजरेकर म्हणाले की, आम्ही जेव्हा स्ट्रगल करायचो, तेव्हा रेणुका प्रस्थापित अभिनेत्री होती. ती माझी मैत्रीण होती आणि आहे. मात्र, आतापर्यंत तिच्यासोबत काम करत आलं नाही. पण, आता आम्हाला एकत्र सिनेमा करता आला. देवमाणूससाठी रेणुका परफेक्ट निवड होती. तिने फार उत्तम काम केलं. बऱ्याचदा उत्तम रोल मिळाली की, वाहवत जाण्याची भीती असते. पण, तिने खूपच चांगलं काम केलं. तिच्याकडून मलाही काम करताना उर्जा मिळाली. तिच्या सोबत काम करत असल्याचा मलाही फायदा झाला. तिच्या प्रत्येक अॅक्शनला स्पॉन्टनिअसली रिअॅक्ट करता आलं, असं मांजरेकर म्हणाले.

देवमाणूसमधल्या कामाचा आनंद…
चित्रपटातील रोलविषयी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मला बहुतेक निगेटिव्ह शेड्स असलेले रोल मिळाले. मात्र, देवमाणूस सिनेमा मला ऑफर झाला. यातला केशवराव मी साकारला. हा रोल अनेकांनी चांगला केला असता. पण, सिनेमा एडीट झाल्यानंतर मी पाहिले, तेव्हा हा रोल किती चांगला केला किंवा किती वाईट केला, हे मला माहिती नाही. पण, हा मी रोल मी का केलाय? याचा पश्चाताप झाला नाही. उलट आनंद झाल्याचं मांजरेकर म्हणाले.

बच्चन, साटम अन् विक्रम गोखले माझे देव…
पुढं बोलताना ते म्हणाले, मी खूप अभिनेत्यांना माझ्या कामाचं क्रेडीट देतो. रोल चांगला करण्यासाठी कशी तयारी करावी हे मी या अभिनेत्यांकडून शिकलो. माझ्यासाठी नसिरुद्दीन शहा, अमिताभ बच्चन, शिवाजी साटम हे सगळे देवच आहेत. सर्वात मोठा देव विक्रम गोखले आहेत. अभिनेत्यांनं सहज आणि नॅचरली कसं काम करावं, हे मी त्यांच्याकडून शिकलो, असं मांजरेकर म्हणाले.

अ‍ॅक्टिंग म्हणजे, रिअ‍ॅक्ट होणं असतं…
अनेकजण अ‍ॅक्टींग केली, असं म्हणतात. पण, ती अ‍ॅक्टींग नसतेच. अ‍ॅक्टिंग म्हणजे, रिअ‍ॅक्ट होणं असतं, हे ज्या नटाला कळत, तो नट चागंला असतो, असंही मांजरेकर म्हणाले. नटाला प्रॉपर्टीजचा चांगला वापर करता यायला हवा, असं मांजरेकर म्हणाले.

नाटक मी कधीच सोडणार नाही…
नाटक मी कधीच सोडणार नाही. मला कधीतरी एक नाटक करायचं. मी त्यासाठी वेळ काढणार आहे. मला नाटक करायचं असतं तेव्हा मी नफा-तोट्याचा विचार करत नाही. मला त्यापेक्षा नाटकातून मिळणारा आनंद महत्वांच आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलंय. हा चित्रपट 25 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us