Dimple Kapadiya: डिंपलने केलेल्या नानांविषयींच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाली, “ते मला…

Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) आणि डिंपल कपाडियांनी (Dimple Kapadiya) अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. तरी देखील एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी नानांविषयी असे का म्हणाला आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. एकेकाळी बॉलिवूड (Bollywood) गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. […]

dimple-kapadia

dimple-kapadia

Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) आणि डिंपल कपाडियांनी (Dimple Kapadiya) अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. तरी देखील एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी नानांविषयी असे का म्हणाला आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. एकेकाळी बॉलिवूड (Bollywood) गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे.


तसेच त्यांनी अनेक सिनेमे देखील हिट ठरले होते. तरी देखील डिंपल यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान नाना पाटेकरांना किळसवाणे असल्याचे तिने म्हटले आहे. डिंपल हिने एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला होता. यावर डिंपल यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ‘मला नाना पाटेकर हे किळसवाणे वाटतात, असे डिंपल नानांबद्दल म्हणाली होती.

पुढे ती म्हणाली होती की, ‘चांगल्या मार्गाने आणि वाईट या दोन्ही मार्गाने. ते खूप प्रतिभावान आहेत. यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या अनेक चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की, त्यासाठी मी माझा जीव देखील देऊ शकते. तसेच डिंपल यांनी नानांच्या नकारात्मक बाजूविषयी बोलत असताना सांगितले आहे की, एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागत असत.

Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !

आम्ही दोघे खूप चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची भयंकर बाजू देखील बघितली आहे. त्यांची ती नकारात्मक बाजू आहे, आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते. जी आपण सर्वांपासून लवपून ठेवत असतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांची ती बाजू खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवले असल्याचे तिने यावेळी सांगितले  आहे. डिंपल आणि नाना पाटेकर यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ सारख्या सिनेमामध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी एकमेकांसोबत काम केले नाही. त्यानंतर २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘तुम मिलो तो सही’ या सिनेमात त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

Exit mobile version