Sanjay Gadhvi : धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन…

Sanjay Gadhvi Passed Away: ‘धूम’ आणि ‘धूम 2’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले आहे. संजय गढवी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने […]

Sanjay Gadhvi

Sanjay Gadhvi

Sanjay Gadhvi Passed Away: ‘धूम’ आणि ‘धूम 2’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले आहे. संजय गढवी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं

संजय गढवी यांना धुम चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. संजय यांनी 2000 मध्ये ‘तेरे लिए’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाचे आधी नाव ‘तू ही बात’ असे होते, ज्यामध्ये अर्जुन रामपाल आणि रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

फिल्ममेकर शेखर कपूर यांची सिंगापूरमधील कार्यक्रमाला हजेरी, क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंगवर केलं मार्गदर्शन

मात्र, कमी बजेटमुळे हा चित्रपट रखडला. त्यांना पुढे 2004 साली चांगलीच प्रसिद्धी मिळाली. संजय गढवींनी ‘धूम’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. धूम चित्रपटात अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, जॉन अब्राहम, ईशा देओल आणि रिमी सेन सारखे स्टार्स चमकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर

संजय गढवी हे अंधेरी भागातील ग्रीन एकर्स या इमारतीत राहत होते. आज सकाळी संजय गढवी यांचे निधन झाले आहे. संजय गढवी हे घरी असताना बेशुद् पडले. त्यानंतर संजय गढवी यांना तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नेहरूंच्या एका निर्णयाने बीसीसीआय वाचली, भारतीय क्रिकेटचा रंजक प्रवास

धूम 2, ‘मेरे यार की शादी है’, इम्रान खान स्टारर ‘किडनॅप’ ‘अजब गजब लव’ ‘ऑपरेशन परिंदे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. फिल्म डायरेक्टर कुणाल कोहली, फिल्म मेकर संजय गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संजय गढवी यांना श्रद्धांजली वाहिली. संजय गढवी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Exit mobile version