Fighter Movie: दीपिका अन् हृतिक वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस

Fighter Movie Gets Legal Notice: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटातील किसिंग सीनबाबत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, असा आरोप लावला जात आहे, कारण हे दृश्य हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे. आसाम हवाई दलाचे अधिकारी सौम्य दीप दास यांनी सिद्धार्थ आनंदसह निर्मात्यांना ही […]

Fighter Movie : हृतिक-दीपिकाच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं, फायटर पोहचला 350 कोटींच्या जवळ

Fighter Movie

Fighter Movie Gets Legal Notice: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटातील किसिंग सीनबाबत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, असा आरोप लावला जात आहे, कारण हे दृश्य हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे.

आसाम हवाई दलाचे अधिकारी सौम्य दीप दास यांनी सिद्धार्थ आनंदसह निर्मात्यांना ही नोटीस पाठवली आहे. आसाम हवाई दलाचे अधिकारी सौम्य दीप दास यांनी सिद्धार्थ आनंदसह निर्मात्यांना ही नोटीस पाठवली आहे. त्याने त्यात सांगितले आहे की, या सीनमुळे भारतीय वायुसेनेची प्रतिमा मलिन होत आहे आणि त्याच्या सन्मानालाही हानी पोहोचते..

ज्या सीनवरून वाद सुरू आहे, त्या सीनमध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन लिप लॉक करताना दिसत आहेत. दोघेही हवाई दलाच्या गणवेशात आहेत. आमचा गणवेश हा केवळ कापड नसून ते आमच्या कर्तव्याचे, निःस्वार्थ सेवेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठीच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचे शक्तिशाली प्रतीक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कायदेशीर नोटीसमध्ये काय लिहिले आहे? नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “चित्रपटात हवाई दलाचे अधिकारी अशा प्रकारची कामे करताना दाखविल्याने देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या हवाई दलातील हजारो अधिकाऱ्यांचे त्याग आणि समर्पण कमी होते.” हे जनतेला एक संदेश देते की भारतीय हवाई दलाचे अधिकारी त्यांच्या कर्तव्यांबद्दल गंभीर नाहीत आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील वचनबद्धतेबद्दल अधिक चिंतित आहेत.

Sandeep Reddy Vanga: ॲनिमलचे दिग्दर्शक पहिल्यांदा किंग खानला भेटले तेव्हा नेमकं काय घडलं?

या नोटिशीत असेही सांगितले आहे की, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांची अशा प्रकारे चुकीची माहिती दिल्याने भारतीय वायुसेनेच्या भावना दुखावतातच, शिवाय जनतेमध्ये हवाई दलाबद्दल असलेला आदरही कमी होतो.

‘चित्रपटातील दृश्ये कायदेशीर आणि सेवा वर्तनाचे उल्लंघन करतात’: त्यांच्या नोटीसमध्ये, अधिकाऱ्याने लिहिले आहे की हे दृश्य अनेक कायदेशीर आणि सेवा आचारसंहितेचे उल्लंघन करते. सर्वप्रथम, हे भारतीय वायुसेना कायदा 1950 च्या कलम 45-47 चे उल्लंघन करते, जे म्हणते की कोणीही या सेवेची बदनामी करू शकत नाही.

Exit mobile version