Siddharth Anand: सिद्धार्थचा आगामी सिनेमा मेगा-बजेट ॲक्शनर असणार? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Siddharth Anand: सिद्धार्थचा आगामी सिनेमा मेगा-बजेट ॲक्शनर असणार? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Siddharth Anand Next Directorial: ‘वॉर’, ‘पठाण’ आणि ‘फाइटर’ सारखे बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर आणि हिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी त्याच्या आगामी दिग्दर्शनाचा प्रोजेक्ट लॉक केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा आगामी चित्रपट एक “स्टँडअलोन मेगा-बजेट ॲक्शन फिल्म” (Mega-Budget Actioner) असणार आहे. (Social Media) जो त्याच्या प्रोडक्शन हाऊस मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि निर्मात्या ममता आनंद यांच्या अंतर्गत तयार होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)


गेल्या काही काळापासून स्क्रिप्टवर काम करत असून त्याच्या कारकिर्दीतील 9 व्या दिग्दर्शनासह सुरुवात करण्यासाठी ते उत्साहित आहे अशी माहिती मिळाली. (Next Directorial) मिळालेल्या माहितीनुसार असेही कळते की शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर किंग सिद्धार्थ आनंद निर्मित करेल आणि सुजॉय घोष दिग्दर्शित करेल. चित्रपट निर्माता सध्या त्याच्या निर्मिती उपक्रमात व्यस्त आहे. ‘ज्वेल थीफ’, जे त्याला आणि सैफ अली खानला 17 वर्षांनंतर एकत्र आणत आहे. चित्रपट निर्माता ‘क्रिश 4’ च्या स्क्रिप्टवर देखील काम करत आहे.

आनंदची प्रोजेक्ट्सची लाइन-अप ‘ज्वेल थीफ’वर थांबत नाही. चित्रपट निर्मात्याने महिलांच्या नेतृत्वाखालील ॲक्शन चित्रपट देखील विकसित केला आहे, जो सध्या कास्टिंगच्या टप्प्यात आला आहे. सध्या होत असलेल्या चर्चवरून आनंद कदाचित ‘पठाण’ किंवा ‘फायटर’ किंवा ‘टायगर व्ही/एस पठाण’ चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत असेल.

Siddharth Anand: ‘फायटर’च्या किसिंग सीनबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले… 

सिद्धार्थ आनंदने पुढे माहिती दिली की, त्याचे पुढील दिग्दर्शन लॉक केले आहे.  हा सिनेमा मार्फफ्लिक्ससाठी एक स्वतंत्र मेगा-बजेट ॲक्शन फिल्म आहे. सिद्धार्थ  काही काळापासून स्क्रिप्टवर काम करत आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील 9व्या दिग्दर्शनाची सुरुवात करण्यासाठी तो खूप उत्साहित आहे. निर्मात्या ममता आनंदसोबत सिद्धार्थ आनंदचे त्याच्या निर्मिती उपक्रमासाठी 6 पेक्षा जास्त चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube