Shri Shri RaviShankar यांचा जीवनपट झळकणार मोठ्या पडद्यावर; सिद्धार्थ आनंद-महावीर जैन सज्ज
Shri Shri RaviShankar film by Siddharth Anand and Mahaveer Jain : बॉलीवूडचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि निर्माते महावीर जैन (Mahaveer Jain) हे प्रेक्षकांसाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील थ्रिलर चित्रपट बनवत आहेत सिद्धार्थ आणि महावीर यांचा हा आगामी चित्रपट आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Shri Shri RaviShankar) यांच्या जीवनावर आधारित आहे.
‘शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा’; संजय राऊतांचा घणाघात
या चित्रपटाबाबत आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार रविशंकर यांच्या जीवनातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे ज्यामध्ये त्यांनी कोलंबियातील 52 वर्षापूर्वी कोणत्याही शास्त्राचा वापर न करता गृहयुद्ध संपवलं होतं. याबाबत नीतू महावीर जैन यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केले आहे.
थेट घरी धडकले पोलीस, मनोरमा खेडकरांना बजावली नोटीस; कारणही आलं समोर
ज्यातील व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकर यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले जात आहे. तर या व्हिडिओला कॅप्शन देताना नीतू महावीर जैन यांनी सांगितलं की सिद्धार्थ आनंदाने महावीर जैन हेनू लवकरच आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत.
ज्यांनी 52 वर्षांपूर्वी कोलंबियांमध्ये कोणत्याही शस्त्रांचा वापर न करता गृहयुद्ध संपवलं होतं. या चित्रपटाची कथा परदेशातील असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्यात येत आहे ज्यामध्ये जगभरातील कलाकारांचा समावेश असणार आहे.