Dinesh Phadnis : सीआयडी या हिट टीव्ही शोमध्ये फ्रेडरिक ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेता दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेडरिक या भूमिकेमुळं दिनेश यांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र, आता त्यांची तब्येत खालावल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची चिंता पसरली आहे.
‘दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, पण…’; शंभुराजे देसाईंचा सातारा लोकसभेबाबत सुचक विधान
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेश फडणीस यांच वय 57 वर्ष असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिनेशची प्रकृती चिंताजनक असून ते तो व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर आहेत. सध्या ते जीवन-मरणाशी झुंज देत आहेत त्यांच्या आजाराची बातमी येताच फ्रेडरिकचे चाहते आणि C.I.D. कलाकारांना धक्काच बसला.
दरम्यान सीआयडी टीमला काल रात्री दिनेशच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली, त्यानंतर अनेक लोक त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
बनावट नोटांचे रॅकट उद्धवस्त, NIA कडून महाराष्ट्रासह चार राज्यांत छामेमारी
कोण आहेत दिनेश फडणीस?
दिनेश फडणीस यांनी सीआयडीमध्ये ‘फ्रेडरिक’ उर्फ फ्रेडी म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दिनेश हे जवळपास 20 वर्षे या शोचा एक भाग राहिले. शोमधील त्याची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली. याशिवाय त्यांनी सरफरोश, मेला यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त त्यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही काम केले आहे. आता गेल्या काही वर्षापासून ते पडद्यापासून दूर असूनही सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतात. दरम्यान, दिनेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिनेश हे आजारातून लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.