Gela Madhav Kunikade : पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रशांत दामले (Prashant Damle) आणि विनय येडेकर (Vinay Yedekar) ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. होय, नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
या बातमीनुसार, रसिकांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा ‘गेला माधव कुणीकडे‘ हे नाटक येत आहे. 7 डिसेंबर 1992 ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या लोकप्रिय नाटकाचे आजवर 1802 प्रयोग झाले आहे. मात्र मध्यंतरी या नाटकाने ब्रेक घेतला होता मात्र आता पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी गेला माधव कुणीकडे हे नाटक येत आहे.
15 जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4.00 वाजता गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ होणार आहे. तर या नाटकासाठी तिकटी विक्रीचा शुभारंभ 1 जून रोजी ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होणार आहे.
रसिकांनी या नाटकाला भरपूर प्रेम दिले आहे. यामुळे हे नाटक पुन्हा एकदा मायबाप रसिकांसाठी रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाला जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. या नाटकामध्ये दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना पाहायला मिळत होती.
IPL 2024 संपताच BCCI ची मोठी घोषणा, मैदानावर राबणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपये
प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक या नाटकात दिसणार आहे. या नाटकासाठी प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.