Download App

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेता लवकरच करणार OTTवर पदार्पण, जाणून घ्या डिटेल्स

Tusshar Kapoor: अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) निर्मात्या प्रेरणा अरोराच्या ओटीटी चित्रपट “डंक-वन्स बिटन” (Dunk Once Bitton) मध्ये मुख्य भूमिका साकारणार असून हा अभिनेता अजिंक्य हे पात्र साकारून वकिलाची भूमिका साकारणार आहे. (Social media) तुषार कपूरसाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खूप खास ठरणार आहे. तुषार हा बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि आता या नव्या चित्रपटात तो काय जादू करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

‘डंक’ बद्दल बोलताना प्रेरणा म्हणाली की, ‘डंक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट ठरणार आहे. एक समाज म्हणून आपण जमीन बळकावण्याच्या या धोक्याविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना सशक्त आणि संरक्षण देणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे.

उत्तम कथानक आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, राष्ट्रीय विजेते ‘पॅड मॅन’, ‘परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण’ यासारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. तुषार कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आदी प्रमुख भूमिकेत आहेत.’डंक’ व्यतिरिक्त, प्रेरणा अरोरा तेलगू चित्रपट ‘हीरो हिरोइन’ची निर्मिती करत आहे ज्यात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे.

Fighter: हृतिक रोशनचा ‘फायटर’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

लवकरच तुषार कपूर एकता कपूरच्या LSD 2 मध्ये कॅमिओ साकारताना पाहायला मिळणार आहे. याअगोदर एकता आणि तुषार ‘क्या कूल हैं हम’, ‘शूटआउट ॲट वडाला’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ सारख्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी LSD 2 चे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. या सिनेमाचे पहिले पोस्टर 2023 मध्ये शेअर करण्यात आलं होतं आणि दुसरं पोस्टर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी रिलीज करण्यात आलं होतं. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज