FIR Against Orry : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माता वैष्णोदेवी मंदिराच्या (Mata Vaishnodevi Temple) बेस कॅम्प असलेल्या कटरा दारू पिल्याबद्दल ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत जम्मू आणि काश्मीर पोलिसांने (Jammu and Kashmir) दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू पिल्याच्या आरोपाखाली ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यात रशियन नागरिक अनास्तासिला अरझामास्किना याचा देखील समावेश आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ओरी, दर्शन सिंग (Darshan Singh) , पार्थ रैना, ऋतिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अनास्तासिला अर्जमास्किना (Anastasila Arjamaskina) विरुद्ध कटारा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड संहिताच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली आहे. कटरा येथील कॉटेज सुइट परिसरात दारू आणि मांसाहारावर कडक बंदी असतानाही ते त्यांच्या हॉटेलच्या आवारात दारू पिताना आढळले, असे पोलिसांनी सांगितले. तक्रार मिळताच, एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
‘आरडी’ चा दमदार ट्रेलर, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
तपासासाठी विशेष पथक स्थापन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसपी कटरा, डीएसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आला असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात पुढील चौकशीसाठी ओरीसह सर्व आरोपींना सामील होण्याचे निर्देश देऊन नोटीस पाठवल्या जातील.
6 महिने थांबा, आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार, सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट