6 महिने थांबा, आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार, सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

Supriya Sule On Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. तर आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यात आयोजित पक्षातील बैठकीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य केले. तसेच त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे.
आणखी एकाची विकेट जाणार
या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. विजय- पराभव सुरूच असतो. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिम्मत असेल तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांनी घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
बर झाले पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे. असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर