Ira Khan Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची पत्नी रीना दत्त (Reena Dutt) यांची मुलगी इरा खान (Ira Khan) लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार आहे. काही दिवसांत इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार असून प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आहेत. इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत, यामध्ये आमिरची दुसरी पत्नी किरण राव देखील दिसत आहे. मिथिला पालकरनेही या जोडप्याचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
इरा आणि नुपूर 3 जानेवारीला लग्न करणार आहेत आणि दोन्ही कुटुंबे त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. मिथिलाने सोशल मीडियावर (social media) एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा….’ यावेळी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद रावही तिथे उपस्थित आहेत. इराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. यामध्ये ती तिचे कुटुंबीय आणि उपस्थित पाहुण्यांना दाखवत आहे. शेवटच्या फोटोत विमानतळावर इराचे मित्र भारतात पोहोचले आहेत.
प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये इरा लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. तर नुपूरने कुर्ता पायजमा आणि पगडीही घातली आहे. आमिर कोणत्याही फोटोत किंवा व्हिडिओमध्ये दिसत नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने आपल्या मुलीच्या लग्नाबाबत चर्चा केली होती. एका मुलाखतीमध्ये आमिर म्हणाला की, “मी खूप भावूक आहे. त्या दिवशी मी खूप रडेल हे निश्चित आहे.
Omi Vaidya: ओमी वैद्यच्या ‘आईच्या गावात मराठीत बोल’चे ट्रेलर अन् पहिलं गाणं रिलीज
इराने 18 नोव्हेंबर 2022 मध्ये नुपूरसोबत एंगेजमेंट केली होती. त्या कार्यक्रमाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुपूरबद्दल बोलायचे तर तो फिटनेस एक्स्पर्ट आणि जिम ट्रेनर आहे, तो अनेक सेलिब्रिटींना ट्रेन करत असतो. तो आमिर खानचा देखील ट्रेनरही आहे, शिवाय त्याने सुष्मिता सेनला 10 वर्षे ट्रेनिंगही दिली आहे.