Omi Vaidya: ओमी वैद्यच्या ‘आईच्या गावात मराठीत बोल’चे ट्रेलर अन् पहिलं गाणं रिलीज
Aaichya Gavat Marathit Bol: कोणत्याही सिनेमाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी सिनेमात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर सिनेमाचे प्रदर्शन होण्याअगोदरच त्याची धमाल चर्चा सुरु होते. (Marathi Movie) असाच एक मराठी सिनेमा आहे (Aaichya Gavat Marathit Bol) ‘आईच्या गावात मराठीत बोल’
‘आईच्या गावात मराठीत बोल’चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबईमध्ये सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतचं पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ (Aaichya Gavat Marathit Bol) या सिनेमाद्वारे ओमी वैद्यची (Omi Vaidya) भन्नाट मराठी चाहत्यांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हणायचे हे चाहत्यांनी ठरवायचं आहे.
View this post on Instagram
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मराठी मुलीसोबत लगीनगाठ बांधली की तिच्या वडिलांची संपत्ती आपलीच असा विचार करून परदेशस्थ समर (ओमी) भारतात येतो. दोन महत्वाची कामे घेऊन तो आलेला आहे. एक म्हणजे मराठी मुलगी शोधणे आणि दुसरे आणि अधिक महत्वाचे अस्खलित मराठी बोलायला शिकणे ही कामे अभिनेत्याला करायची आहेत. भारतातला या संबंधातला त्याचा सिनेमा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यात लग्नासाठीचा खटाटोप तर तुम्हाला गुदगुल्या करेलच पण पुढे जे काही घडणार आहे, त्याने तर तुम्ही लोटपोट होणारच आहात. तर १९ जानेवारी २०२४ निश्चित करून ठेवा. मुहूर्त चुकवू नका…
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या सिनेमाची दर्जेदार गाणी व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वनाथ यांचे आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले आणि ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी गोड मधुर आवाज दिला आहे. ‘तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे. तर ऋषिकेश रानडे याने गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या सिनेमात सुद्धा रोमॅंटीक माहोल तयार करत आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल ‘ चे शिर्षक गीत सिनेमाला शोभेल असं विनोदी पण तितकंच अर्थपूर्ण असे आहे, अशी भावना संगीतकार अविनाश विश्वजित यांनी व्यक्त केली. ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून सिनेमाची आखणी सुरु केली आणि दोघांनी तेथूनच संचबांधणीही सुरु केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी तर संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी सांभाळले आहे.
ओमी वैद्य आपल्या पहिल्याच मराठी सिनेमात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारत आहे. त्याची उत्तम अभिनयाची छाप कायम असतानाच सिनेमाच्या ट्रेलरमधून त्याची दिग्दर्शनाची बाजू भक्कम आहे, हे देखील बघायला मिळत आहे. त्याचा आणि सहकलाकारांचा सिनेमातील सहज वावर चाहत्यांची मने निश्चित जिंकू शकणार अशी चर्चा देखील रंगत आहे.
Year Ender 2023 : नव्या चेहऱ्यांनी गाजवलेलं वर्ष 2023; या स्टार किड्सने केली बी टाऊनमध्ये एन्ट्री!
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या सिनेमामधील मुख्य भूमिका ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर अशी दमदार आहे.
या सिनेमाची निर्मिती अहमद लुकान, डॉ.जलदीप दलूत, पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, सामिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मॉंटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया, राजन वासुदेवन, राजीव आणि शीतल शाह, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे आणि उदय कुमार यांनी केली आहे. आणि आता थोडीशीच वाट बघायची आहे..१९ जानेवारीची… तयार आहात ना…काहीतरी आगळं वेगळं मिंग्लिश ऐकायला आणि बघायला!