Year Ender 2023 : नव्या चेहऱ्यांनी गाजवलेलं वर्ष 2023; या स्टार किड्सने केली बी टाऊनमध्ये एन्ट्री!
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये नव्या चेहऱ्यांचे वर्ष ठरलं कारण यावर्षी अनेक नवख्या अभिनेत्री आणि अभिनेते अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले यामध्ये सगळ्यात चर्चेत राहिले ते म्हणजे बॉलीवूडचे स्टार किड्स यामध्ये एक ना अनेक अशी नावे घेता येतील कोणकोणते आहेत हे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारे नवखे अभिनेते आणि अभिनेत्री पाहूयात…
Rajkumar Rao: राजकुमार रावचा पान टिपू येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
यामध्ये बच्चन कुटुंब शाहरुख खानच्या कुटुंब देऊन कुटुंब कपूर कुटुंब अशा बॉलीवूड मधील अभिनयाचा वारसा असलेल्या घराण्यांमधून या स्टार किड्स ने चित्रपटसृष्टी मध्ये पाऊल ठेवला आहे त्यामध्ये पहिले नाव येतं ते शाहरुख खानच्या मुला मुलींचे यावर्षी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान त्याचबरोबर मुलगा आर्यन खान यांनी देखील चित्रपटांमध्ये पदार्पण केला आहे.
सुहाना खान आणि आर्यन खान
सुहाना खानचा द अर्चिज हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर शाहरुखचा मुलगा आर्यन याने मात्र अभिनयाऐवजी वेगळा मार्ग निवडला तो अभिनेता म्हणून नाही तर स्क्रिप्ट रायटर म्हणून या क्षेत्रामध्ये आला आहे या संदर्भात त्याने इंस्टाग्राम वर एक पोस्ट करत माहिती दिली होती.
Ahmednagar : नगर महापालिकेत आता ‘प्रशासक’राज; सभा, बैठका सगळंच बंद
अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर
तर द आर्चीज हा चित्रपट स्पेशली स्टार किड्ला बॉलिवूडमधील लॉन्च करणारा चित्रपट ठरला. कारण याच चित्रपटांमध्ये महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नातवाने म्हणजे श्वेता नंदा हिच्या मुलगा अगस्त्य नंदा याने देखील द आर्चीज याच चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्यानंतर श्रीदेवीची दुसरी मुलगी आणि जानवी कपूरचे लहान बहीण खुशी कपूर हिने देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. द आर्चीज या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
जरांगे मुंबईत धडकणार! वादळ रोखण्यासाठी शिंदे सरकारकडे पाच पर्याय
अलीजेह अग्नीहोत्री आणि पलक तिवारी
त्याचबरोबर अलीजेह अग्नीहोत्री ही बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बहिणीची मुलगी म्हणजेच त्याची भाची आहे. तसेच ती अलविरा खान अग्नीहोत्री आणि अतुल अग्नीहोत्री यांची मुलगी आहे. नुकताच तिने फर्रे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिनेजेप्रमाणे छोट्या पडद्यावरून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच पावलावर पाऊल तिच्या मुलीने म्हणजेच पलक तिवारीने ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाला म्हणावासा प्रतिसाद मिळाला नाही.
राजवीर देओल आणि पलोमा
त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देओल फॅमिलीने चांगलंच गाजवलं. या कुटुंबातून देखील पुढच्या पिढीने चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एकीकडे ज्येष्ठ अभिनेते सनी देओल यांच्या गदर टू चित्रपटाने यावर्षी धुमाकूळ घातला. तर दुसरीकडे सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दोनो’ या चित्रपटातून त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. तरी याच चित्रपटातून अभिनेत्री पूनम धिल्लन यांची मुलगी पलोमा हिने देखील मुख्य भूमिका साकारत चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं.