Download App

शाहरुख नंतर सलमान खानही क्रिकेटमध्ये; ‘या’ संघाचा बनला मालक

Salman Khan In ISPL Season 3 :  बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने देशातील सर्वात मोठी टेनिस-बॉल टी10 लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL ) मध्ये

  • Written By: Last Updated:

Salman Khan In ISPL Season 3 :  बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने देशातील सर्वात मोठी टेनिस-बॉल टी10 लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL ) मध्ये संघ खरेदी केला असल्याची माहिती आयएसपीएलकडून देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या सीझनमध्ये सलमान खान (Salman Khan) दिल्ली फ्रँचायझीचा मालक असणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन सीझनला जबरदस्त लोकप्रियता मिळाल्यानंतर आयएसपीएलमध्ये (ISPL Season 3) दिल्ली या नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे.

आयएसपीएलच्या या घोषणेनंतर सलमान खान अशा सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे ज्यांच्याकडे आधीच इतर आयएसपीएल संघ आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सूर्या (चेन्नई सिंघम्स), हृतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद) अशी नावे आहेत.

क्रिकेट हा प्रत्येक भारतीय रस्त्याचा धडधड आहे आणि जेव्हा ती ऊर्जा स्टेडियममध्ये पोहोचते तेव्हा आयएसपीएल सारख्या लीगचा जन्म होतो. मला नेहमीच या खेळाबद्दल आवड आहे आणि आयएसपीएलशी जोडले गेल्याचा मला खूप आनंद आहे. ही लीग केवळ तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन देत नाही तर प्रतिभावान खेळाडूंना एक मजबूत व्यासपीठ देखील देते. असं सलमान खानने म्हटले आहे.

आयएसपीएल गव्हर्निंग कमिटीचे सदस्य आशिष शेलार म्हणाले की, आयएसपीएलने आतापर्यंत दोन उत्तम हंगाम सादर केले आहेत, ज्यात टीव्ही आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रमी प्रेक्षकसंख्या दिसून आली आहे. सलमान खानसारखा सुपरस्टार या प्रवासात आमच्यासोबत जोडल्याने आता आम्ही आणखी भव्य आणि शक्तिशाली तिसऱ्या हंगामासाठी तयार आहोत.

पालिकेची भूमिका संशयास्पद, उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा; आशिष शेलार यांचे निर्देश 

आयएसपीएल सीझन 2 माझी मुंबईने मारली बाजी

आयएसपीएल सीझन 2 माझी मुंबईने जिंकले होते. या हंगामात अनेक उदयोन्मुख स्टार्सनी उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यात अभिषेक दहोर, सागर अली, रजत मुंढे, केतन म्हात्रे, जगन्नाथ सरकार आणि फरदीन काझी यांचा समावेश आहे. विशेषतः अभिषेक दहोरने दोन हंगामात इतके चांगले प्रदर्शन केले की त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात नेट बॉलर म्हणून संधी मिळाली होती.

follow us