शरियानुसार हा गुन्हा असून हे कृत्य हराम… मौलाना रझवी सलमान खानवर का संतापले?

शरियानुसार हा गुन्हा असून हे कृत्य हराम… मौलाना रझवी सलमान खानवर का संतापले?

Salman Khan Clock Controversy : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हातातील घड्याळामुळं चर्चेत आला आहे. सलमानने रामजन्मभूमीचे चित्र असणारे घड्याळ घालून काही फोटो शेअर केले होते. (Salman Khan) लक्झरी ब्रँड असणाऱ्या जेकब अँड कंपनीने डिझाइन केलेल्या या घड्याळात अयोध्येतील राम मंदिर, भगवान राम, भगवान हनुमान आणि इतर अनेक देवतांचे फोटो आहेत. सलमानने हे घड्याळ घातल्यानंतर एकीकडं त्याचं कौतुक झालं, तर दुसरीकडे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.

राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता मोहन भागवत यांचं मोठं विधान

अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानवर ताशेरे ओढले. त्यांनी असे घड्याळ घालणे चुकीचे असल्याचे म्हटले. रझवी यांनी इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही गोष्ट हराम असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, शरियामध्ये कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला गैर-मुस्लिम व्यक्तींच्या धार्मिक प्रतीकांचा, इमारतींचा किंवा मंदिरांचा प्रचार करण्याची परवानगी नाही आणि असं करणं हराम मानलं जातं.

काय म्हणाले मौलाना?

रझवी यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटलं की, ‘मी शरियाच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण स्पष्ट करू इच्छितो. सर्वप्रथम, सलमान खान हा एक प्रसिद्ध मुस्लिम आहे आणि हिंदी चित्रपटांमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. राम मंदिराच्या प्रचारासाठी एक घड्याळ बनवण्यात आले आणि सलमान प्रमोशनसाठी ते घड्याळ घालत आहे. मी त्याला सांगू इच्छितो की तो सर्वप्रथम मुस्लिम आहे. इस्लामी कायदा कोणत्याही मुस्लिमांना गैर-मुस्लिमांच्या धार्मिक प्रतीकांचा, इमारतींचा किंवा मंदिरांचा प्रचार करण्याची परवानगी देत नाही.’

त्यांनी पुढे म्हटले की, ‘जर कोणतीही मुस्लिम व्यक्ती अशा प्रचारात सहभागी असेल, मग तो मंदिराचा प्रचार असेल किंवा रामाशी संबंधित आवृत्तीचे घड्याळ घालणे असेल, तर शरियानुसार तो गुन्हा करत आहे. ते पाप मानले जाते. हे काम हराम आहे आणि त्याने ते टाळले पाहिजे. मी सलमान खानला त्याच्या हातातील रामनाम आवृत्तीचे घड्याळ काढून टाकण्याचा सल्ला देऊ इच्छितो.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या