Salman Khan : माफी मागा नाहीतर पाच कोटी द्या, अन्यथा.. सलमान खानला पुन्हा धमकी
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येत असलेल्या (Salman Khan) धमक्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा हाच प्रकार घडला आहे. सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकीचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. थेट फोन न करता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज मिळाला आहे. या धमकीत देखील लॉरेन्स बिष्णोईचं नाव समोर आलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांना एक धमकीचा संदेश मिळाला. या धमकीत दोन पर्याय दिले आहेत. सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर माफी मागितली पाहिजे. पाच कोटी रुपयेही दिले पाहिजेत असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. आठवड्यातून दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का?, वडिल सलीम खान यांनी एका वाक्यात विषय संपवला
पोलीस सूत्रांवर विश्वास ठेवला तर वाहतूक पोलिसांना काल रात्री लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज मिळाला. या मेसेजमध्ये मी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागितली पाहिजे. नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे लागतील. जर त्याने असे केले नाही तर जीवे मारू. आमची गँग अजूनही सक्रिय आहे असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
३० ऑक्टोबरलाही मिळाली होती धमकी
आता पोलिसांनी या धमकीचा मेसेज पाठविणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. याआधी मागील आठवड्यात अशाच पद्धतीने धमकी देण्यात आली होती. 30 ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात धमकीचा मेसेज मिळाला होता. त्यावेळी सलमान खानकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच मुंबईतील वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती.
Salman Khan: सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी-18’ शो करणार नाही होस्ट; कारण आलं समोर
सलमान खान सध्या बिग बॉसचा १८ वा सिझन होस्ट करत आहे. याआधी एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी काी जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. यानंतर सलमान खानला धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. सातत्याने धमक्या येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.