National Film Award 2025 : ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ (Kathal: A Jackfruit Mystery) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award 2025) जाहीर केले आहे. ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ज्युरींनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पुरस्कार विजेत्यांची अंतिम यादी सादर केली, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू देखील उपस्थित होते.
Announcement of 71st National Film Awards | @nfdcindia | @PIB_India https://t.co/RgE9nvXB6R
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) August 1, 2025
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट -‘कथल’
सर्वोत्तम सिनेमेटोग्राफी – लिटिल विंग (तमिळ)
सर्वोत्तम नॉन-फीचर फिल्म – गिद्ध द स्कॅव्हेंजर
सर्वोत्तम गायिका पुरस्कार – शिल्पा राव
सर्वोत्तम अभिनेते – शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी
सर्वोत्तम अभिनेत्री – राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट ताई फाके चित्रपट – पै तांग
सर्वोत्कृष्ट गारो चित्रपट – रिम्डोगीतांगा
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भगवंत केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – गोड्डे गोडे चा
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट – पुष्कर
सर्वोत्कृष्ट मराठी – श्यामची आई
सर्वोत्कृष्ट कॅनेडियन चित्रपट – कंडिलू
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन चित्रपट – हनु-मन (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – रॉकी और रानी की प्रेम कहानी (धिधोरी बाजे रे)
सर्वोत्कृष्ट गीत – बालगम (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – वाथी (तमिळ) – जीव्ही प्रकाश कुमार
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन हिंदी – ऍनिमल – हर्षवर्धन रामेश्वर
सर्वोत्कृष्ट मेकअप हिंदी चित्रपट – सॅम बहादूर – श्रीकांत देसाई
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सॅम बहादूर-दिव्या गंभीर-सचिन लॉळेकर, निधी गंभीर
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर – ऍनिमल – सचिन सुधाकरन, हरिहरन मुरलीधरन
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट होलसम – रॉकी रानी की प्रेम कहानी
बेस्ट फीचर चित्रपट – 12th फेल
Mahadev Jankar Exclusive : भविष्यात पुन्हा भाजपसोबत जाणार? महादेव जानकर स्पष्टच म्हणाले