National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, असे झाले बदल

National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, असे झाले बदल

National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (National Film Award) अनेक बदल करण्यात आले आहेत. बदलांचा एक भाग म्हणून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. एका अधिसूचनेनुसार, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे.

बक्षीस नियमांमध्ये बदल
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने सुचविलेल्या विविध श्रेणींतील सन्मानांसाठी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 च्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. या बदलांमध्ये रोख पारितोषिकांमध्ये वाढ आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचा समावेश करण्यात आला. अहवालानुसार, समितीने कोरोनादरम्यान झालेल्या बदलांवर चर्चा केली. हे बदल करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला.

2022 च्या पुरस्कारांसाठी प्रवेश बंद
चित्रपट निर्माते प्रियदर्शन हे देखील पॅनेलचे सदस्य आहेत. प्रियदर्शन म्हणाले की, त्यांनी डिसेंबरमध्ये अंतिम शिफारसी दिल्या होत्या. ते म्हणाले की, साऊंडसारख्या तांत्रिक विभागात मी काही शिफारशी केल्या आहेत. 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी प्रवेशिका 30 जानेवारी रोजी बंद झाल्या. कोरोनामुळे पुरस्कार मिळण्यास एक वर्ष उशीर होत असून 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार 2023 मध्ये दिले जात आहेत.

या पुरस्कारांची नावं बदलली
समितीने सुचविलेल्या आणि नियमांमध्ये समाविष्ट केलेल्या बदलांनुसार, ‘दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार’ चे नाव बदलून ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ असे केला आहे. यापूर्वी बक्षिसाची रक्कम आधी निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात विभागली जात होती, पण आता ती फक्त दिग्दर्शकाकडे जाईल.

त्याचप्रमाणे ‘राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’साठीचा ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ आता ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ म्हणून ओळखला जाईल. या श्रेणीमध्ये सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार विभाग देखील विलीन झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज