National Film Awards : ‘वाळवी’ ची मराठी मोहोर तर, ‘गुलमोहर’ ने हिंदीत मारली बाजी

हिंदीत गुलमोहर चित्रपटाने बाजी मारली आहे. “सर्वोत्कृष्ट कथन (व्हॉईसओव्हर) 'मर्मर्स ऑफ द जंगल' ला जाहीर करण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 08 16T141932.077

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज (दि.16) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (National Film Awards) विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीपर्यंत अनेक श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठीत ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, हिंदीत ‘गुलमोहर’ चित्रपटाने बाजी मारली आहे. “सर्वोत्कृष्ट कथन (व्हॉईसओव्हर) ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ ला जाहीर करण्यात आला आहे. (70th National Film Awards)

कुणा-कुणाला मिळाले पुरस्कार

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज आर बडजात्या यांची ‘उंचाई’ साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार –  नित्या मेननला ‘थिरुचित्रंबलम’ आणि मानसी पारेखला ‘कच्छ एक्सप्रेस’साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – शर्मिला टागोरच्या गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार – ‘वारसा’

सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार मराठी – आदीगुंजन (Murmurs of the Jungle)

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – KGF 2

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजित सिंग (ब्रह्मास्त्र)

– ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाने बाजी मारली आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता (इच्छा या चित्रपटासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म होलसम एंटरटेनमेंट – कांतारा

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक

follow us