Katrina Kaif Women Premier League Up Warriors: कतरिना कैफ’चा (Katrina Kaif) ब्युटी ब्रँड थेट महिला प्रीमियर लीग’मध्ये (Women Premier League Up Warriors) जाऊन पोहचला असून याचा वेगळ्याच चर्चा होताना दिसत आहेत. भारतातील पहिला आघाडीचा सेलिब्रिटी (Celebrity) ब्युटी ब्रँड हा महिला क्रीडा जगतात अभूतपूर्व सहकार्य करत आहे. कतरिनासाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे, तिच्या दूरदर्शी कामासाठी आणि उद्योजकतेसाठी प्रसिद्ध असलेली कतरिना कैफ केवळ सौंदर्य उद्योगात अनोखं काम करताना दिसत आहे.
महिला क्रीडापटूंची ताकद आणि या के ब्युटीच अनोखं सहकार्य महिला सक्षीकरण दाखवून देत आहे. Kay Beauty ने महिला प्रीमियर लीग संघ UP Warriorz सोबत अर्थपूर्ण भागीदारी केली आहे, आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर अनोख्या गोष्टी साजऱ्या केल्या आहेत. UP Warriorz भारतातील स्पोर्टिंग इकोसिस्टममध्ये महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका बजावण्यासाठी महिलांसाठी अनोखं ठरत आहे. Kay Beauty सह कतरिना कैफ च्या कामाची दृष्टी सर्वत्र बघायला मिळते.
शाहरुखच्या ‘डंकी’ आणि प्रभासच्या ‘सालार’ यांच्यात ‘काटे की टक्कर’; 4 दिवसांत केला पराक्रम
या अनोख्या सहकार्याबद्दल बोलताना कतरिना म्हणते “के ब्युटी फक्त मेकअप बद्दल नाही हा व्यक्तिमत्व आणि सामर्थ्याचा उत्सव आहे. महिला क्रीडा सोबत हि आमची भागीदारी नक्कीच खास आहे. आम्हाला विश्वास आहे की महिला सक्षमीकरणा साठी हि बाब खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आम्ही UP Warriorz साठी चीअर करत आहोत आणि येत्या दीर्घ काळासाठी त्यांच्याशी जोडल जातोय याचा आम्हाला अभिमान आहे.
सौंदर्याचे जग जसजसे विकसित होत आहे, तसतसे अर्थपूर्ण बदल घडत असून महिला सशक्तीकरण करून के ब्युटी सध्या आघाडीवर आहे. प्रत्येक भागीदारीसह हा ब्रँड महिलांच्या कामाचं कौतुक करत असून महिला खेळाडूना पाठिंबा देत आहे.