शाहरुखच्या ‘डंकी’ आणि प्रभासच्या ‘सालार’ यांच्यात ‘काटे की टक्कर’; 4 दिवसांत केला पराक्रम
Shah Rukh Khan Dunki Beat Prabhas Salaar : गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर (Box Office) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan ) ‘डंकी’ (Dunki Movie) आणि प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट डिसेंबर 2023च्या शेवटी एका दिवसाच्या अंतराने प्रदर्शित झाले. थिएटरनंतर आता ओटीटीवरही ही टक्कर पाहायला मिळत आहे. ‘डंकी’ने ओटीटीवर ‘सालार’ला मागे टाकले आहे आणि मोठा गल्ला कमावला आहे.
‘डंकी’ 14 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाला पहिल्या चार दिवसांत 4.5 मिलियन म्हणजेच 45 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, ‘सालार’ या बाबतीत मागे पडले आहेत. ‘सालार’ला 9 दिवसांत केवळ 3.5 मिलियन म्हणजेच 35 लाख व्ह्यूज मिळाले होते. अशा परिस्थितीत ‘डंकी’ ओटीटीवरील दर्शकांच्या बाबतीत सालारपेक्षा खूपचं पुढे गेला आहे.
Drishyam 3: अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ कधी येणार, दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा
OTT वर ‘सालार’ कधी आला? थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात सालारने OTT वर प्रवाहित करणे सुरू केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 21 जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र, त्यावेळी ते तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला होता. त्याची हिंदी आवृत्ती 16 फेब्रुवारी रोजी OTT वर आली.
‘सालार’ आणि ‘डंकी’ने किती कमाई केली? दोन्ही चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ‘डंकी’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 454 कोटींची कमाई केली होती आणि सालारने 617 कोटींचा व्यवसाय केला होता. हे दोन्ही चित्रपट चाहत्यांना खूप आवडले. शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह, बोमन इराणी, अनिल ग्रोवर असे अनेक स्टार्स ‘डंकी’मध्ये दिसले होते. ‘सालार’मध्ये प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रिया रेड्डी आणि श्रुती हसनही होत्या. मात्र, ‘सालार’च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांना त्याच्या दुसऱ्या भागाचीही प्रतीक्षा आहे. खरं तर पहिल्या भागात कथा आणखी संपलेली नाही. त्यामुळे चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.