Download App

श्यामबाबूंचा डिव्हाईन स्पर्श कधीच विसरू शकत नाही ; सौमित्रांची भावनिक पोस्ट

  • Written By: Last Updated:

Kishor Kadam Social Media Post On Shyam Benegal : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते आणि पटकथा लेखक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचं 23 डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 डिसेंबर रोजी त्यांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन करण्यात आलं होतं.  मराठी कवी आणि अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) उर्फ सौमित्र यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

किशोर कदम त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली (Bollywood News) आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले की, आत्ता गेल्या आठवड्यातच ,” श्याम बेनेगल एक व्यक्ती आणि दिग्दर्शक” या डॉक्टर सविता मोहिते यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी रंगमंचावर नसिरुद्दीन शहा , शबाना आझमी , प्रीती सागर , किशोर कदम आणि अजून खूप काही महत्वाचे लोक होते. मला पुस्तकावर बोलायचं होतं, असं देखील त्यांनी म्हटलंय.

150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा

यावेळी किशोर कदम यांनी श्याम बेनेगल यांच्या डिव्हाईन टचवर बोलताना भाष्य केलंय. ते म्हणाले की, श्यामबाबूंचा थंडगार डिव्हाईन स्पर्श मी कधीच विसरू शकत नाही. श्यामबाबूंची खासियत होती की, सगळे ॲक्टर त्यांच्याकडे वर्षानुवर्ष काम यासाठीच करायचे कारण ते अॅक्टरचे डायरेक्टर होते. अॅक्टर म्हणजे त्यांच्यासाठी घरचा माणूस होऊन जातो. नसीर जेव्हा काहीतरी अपघातात सापडला, तेव्हा त्यांनी त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता, तिथून काढून घेऊन त्यांच्या घराजवळच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये दहा एक दिवस अॅडमिट केला होता. सगळा खर्च स्वतः केला होता, तो बरा होईपर्यंत त्यांनी त्याला स्वतःच्या घरात ठेवला होता. स्वतःच्या मुलासारखं ठेवलं होतं. म्हणूनच नासीरने काल स्टेजवरून माईकवर सांगितलं की, THEY ARE LIKE MY FOSTER PARENTS IN MUMBAI.

बबनदादा टायमिंग साधणार? भाजपप्रवेशाच्या चर्चांना फुलस्टॉप पण, सस्पेन्स कायम

अशा आठवणी सांगत किशोर कदम म्हणाले की, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची भेट घेऊ या . त्यांचा हात हातात घेऊया आणि पुन्हा तो DEVINE स्पर्श आपल्यात मुरवून घेऊ या म्हणून मी तिथे गेलो. पुस्तकावर मी बोलणार होतो. शाम बाबूंचीची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे फक्त निराजी तिथे आलेल्या होत्या. मी पुस्तकावर बोललो. नसीर बोलला. बाकी सगळे बोलले पण शामबाबू आले नव्हते. नंतर बातमी कळली. श्यामबाबूंना भेटायचं राहून गेलं. त्यांचा तो डिवाइन्स स्पर्श, त्यांचा तो पवित्र स्पर्श ,अॅक्टरला धीर देणारा ,आधार देणारा ,रिलॅक्स करणारा कायमचा हरवला.

श्यामबाबू तुम्ही जिथे ही असाल तिथे तसेच हसत असाल, तर एकच सांगतो अधूनमधून स्वप्नात येऊन तुमच्या तो डिव्हाईन स्पर्श आशिर्वादासारखा शरीरभर खेळू द्या. रोल साउंड, रोल कॅमेरा आणि अॅक्शन. आता CUT कधी ऐकू येतंय त्याची सारं जग वाट पाहतंय, असं किशोर कदम उर्फ सौमित्र त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

 

follow us