5 लाख शेतकऱ्यांकडून दोन-दोन रूपये घेतले, अन् अमूलचा मंथन तयार झाला…
5 Lakh Farmers Donated 2 rupees For film Manthan : भारत देशात शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. संपूर्ण देशच शेतकरी राजाच्या ऋणात आहे. आपल्या सर्वांनाच अमूल हे नाव परिचयाचं आहे. यामागे एक प्रेरणादायी कहाणी आहे. शेतकऱ्यांनी दोन- दोन रूपये जमा करून 80 हजार कोटी रुपयांच्या कंपनीने एक ऐतिहासिक चित्रपट (Manthan Film) बनवला. अन् तो बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरला. या चित्रपटाचं नाव आहे…मंथन! विशेष म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांनी हा चित्रपट बनवला होता.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालंय. त्यांनी एकामागून एक अनेक चित्रपट दिलेत. यापैकीच एक क्राउडफंडिंग करून बनलेला सिनेमा म्हणजेच मंथन. हा चित्रपट 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता.
अमूलची श्वेतक्रांतीच्या विस्तारात महत्वाची भूमिका
देशात 13 जानेवारी 1970 रोजी एक क्रांती सुरू झाली होती. ही क्रांती ‘ऑपरेशन फ्लड’ किंवा ‘श्वेतक्रांती’ म्हणून ओळखली जाते. या क्रांतीने भारतीय दुग्ध उद्योगात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. लाखो ग्रामीण दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केलं. या क्रांतीदरम्यान ‘अमूल’ हे नाव उदयास आलं, ती सहकारी डेअऱ्यांपैकी एक आहे. आज अमूल भारतातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. या यशात अमूलचं योगदान श्वेतक्रांतीच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं.
अमेरिका, युरोप, नाटो अन् एक टीव्ही शो.. युक्रेन-रशिया युद्धाचं नेमकं कारण तरी काय?
मंथन चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांकडून देणगी गोळा केली
1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या मंथन या चित्रपटाने लोकांना विचार करायला भाग पाडले. या चित्रपटाची कथा शेतकऱ्यांच्या देणगीतून साकारलेल्या अमूल आणि श्वेत क्रांतीची होती. तत्कालीन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांकडून देणगी गोळा केली होती. या चित्रपटात स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी असे प्रसिद्ध कलाकार होते. या चित्रपटाचे सहलेखक डॉ. वर्गीस कुरियन होते, ते ‘अमूल’चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.
मंथनच्या निर्मितीची कथा खूप रंजक आहे. स्वातंत्र्यसैनिक असलेले त्रिभुवनदास पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर गुजरातमधील खेडा येथे शेतकऱ्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली. 1949 मध्ये अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून परतलेले डॉ. वर्गीस कुरियन देखील त्रिभुवनदासच्या योजनेत सामील झाले. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ही सहकारी संस्था आशियातील सर्वात मोठी डेअरी बनली, ज्याला आपण आज अमूल म्हणून ओळखतो. श्याम बेनेगल डॉ. कुरियन यांना भेटले आणि कुरियन यांना श्वेतक्रांतीची संपूर्ण कथा इतिहासात नोंदवायची होती.
नव्या वर्षाची प्रसाद करणार धमाकेदार सुरूवात, बसणार पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत!
चित्रपट कसा तयार झाला?
सुरुवातीला श्याम बेनेगल यावर डॉक्युमेंटरी बनवण्याचा विचार करत होते, पण नंतर त्यांनी तो फीचर फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मंथनच्या निर्मितीला सुरुवात झाली. श्याम बेनेगल एका मुलाखतीत सांगितलं होतं ती, चित्रपट बनवण्याची कल्पना होती, पण पैसा कुठून येणार? हा मोठा प्रश्न होता. यावर डॉ. कुरियन यांनी उपाय शोधला. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे दूध एका दिवसासाठी 6 रुपयांना विकण्याची विनंती केली. चित्रपटाचे बजेट 2 रुपये ठेवून तयार झाले. अन् अखेर चित्रपट तयार झाला. चित्रपट बनल्यानंतर मंथनला 1976 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. श्याम बेनेगल यांनी 70 आणि 80 च्या दशकात चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकणारे चित्रपट केले होते. मंथन देखील यापैकीच एक होता.