नव्या वर्षाची प्रसाद करणार धमाकेदार सुरूवात, बसणार पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत!

नव्या वर्षाची प्रसाद करणार धमाकेदार सुरूवात, बसणार पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत!

Prasad Oak will directing film : 2024 या वर्षाला निरोप देताना काही कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसत आहेत. यातला एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक (Prasad Oak). प्रसाद ओक याने धर्मवीर 2 या चित्रपटाचे 2024 वर्ष गाजवलं. आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा भरभरून प्रेम दिलं. जगभरातून या भूमिकेला उदंड प्रतिसाद (Marathi film) मिळाला. प्रसादने साकारलेली भूमिका दमदार ठरली. प्रसाद कायमच वेगवेगळ्या विषय असलेल्या चित्रपटात भूमिका करताना दिसतो. अशीच एक भूमिका असलेला हा चित्रपट होता.

विनोद कांबळीला नेमका कोणता आजार? मेडिकल अहवालातून धक्कादायक माहिती

येणाऱ्या वर्षात प्रसाद अभिनेता म्हणून वेगवेगळ्या चित्रपटात दिसणार आहेच पण तो एका धमाल चित्रपटाचं दिग्दर्शन करताना ही दिसणार आहे. “सुशीला – सुजीत” ची कथा देखील प्रसाद ओक नेच लिहिली आहे. दिग्दर्शक आणि कथा लेखन अशी दुहेरी भूमिका (Marathi Movie) आहे. सुशीला – सुजीतमध्ये प्रसाद भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फुटबॉलपटूने संपवले जीवन; 6 वर्षांपूर्वी आई, भावानं देखील असंच उचललं होतं टोकाचं पाऊल

प्रसाद 2024 बद्दल सांगताना म्हणतो “वेगळ्या विषयांवरचे आणि चांगले चित्रपट आले की (Entertainment News) प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देतातच. गेल्या 2 ते 3 वर्षात आलेले धर्मवीर, चंद्रमुखी, बाईपण भारी देवा, झिम्मा, धर्मवीर 2, सरसेनापती हंबीरराव, वाळवी, वेड, नाच गं घुमा, नवरा माझा नवसाचा 2, फुलवंती, ये रे ये रे पैसा, पावनखिंड अशा अनेक चित्रपटांनी हे सिद्ध केलं. सरतं वर्ष उत्तम गेल. येणार वर्षही उत्तमच जाणार आहे. मराठी प्रेक्षक चांगले सिनेमे नक्की उचलून धरणार.

नवीन वर्षाची सुरुवात प्रसाद ‘जिलबी’ या सस्पेन्स थ्रिलरने करणार आहे. यात तो एका उद्योगपतीची भूमिका करताना दिसतोय. 17 जानेवारी 2025 ला जिलबी प्रदर्शित होणार असून प्रसाद एका वेगळ्याच भूमिकेत यात दिसणार आहे. 2025 हे वर्ष प्रसाद साठी चित्रपटमय ठरणार यात शंका नाही. जिलबी, गुलकंद, वडा पाव, मीरा, आणि महापरिनिर्वाण या चित्रपटांमधून अभिनय, तर सुशीला सुजीत, पठ्ठे बापूराव, भद्रकाली, आणि निळू फुले यांच्यावरचा चरित्रपट अशा विविध चित्रपटांचं दिग्दर्शन प्रसाद येणाऱ्या वर्षात करणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube