कलावंताचं घर वाचवा! किशोर कदमांच्या पोस्टची CM फडणवीसांकडून काही तासांतच दखल, सचिवांना महत्त्वाचे आदेश

CM Devendra Fadnavis Response To Kishor Kadam : अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी (Kishor Kadam) अंधेरी (पूर्व) येथील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मदतीची मागणी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी बिल्डर आणि सोसायटीच्या काही सदस्यांच्या संगनमताने पुनर्विकास प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. एका कलावंताचे घर (Andheri Redevelopment Dispute) वाचवा, अशी साद किशोर कदम यांनी घातली आहे.
‘जयंत पाटील फक्त कासाला मोठे, दुधाला नाही’; सांगलीतून गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची तातडीची दखल
किशोर कदम यांच्या या पत्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या हस्तक्षेपामुळे सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली. त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
कदम यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
– सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत बिल्डर आणि काही सदस्यांच्या संगनमताने सभासदांची दिशाभूल केली जात आहे.
– महत्त्वाची कागदपत्रे लपवली जात आहेत. सभासदांना निर्णय प्रक्रियेतून वगळले जात आहे.
– 33(11) आणि 33(12)B या DCPR अंतर्गत पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या आणि इतर 23 सभासदांच्या राहत्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
– कमीटी सदस्यांनी काही सभासदांना वेगळे करून त्यांना माहितीपासून वंचित ठेवले आहे, ज्यामुळे त्यांना एकप्रकारे सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला आहे.
– सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी त्यांची मागणी आहे.
भिवंडीत रक्तरंजित थरार! भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची निर्घृण हत्या; कार्यालयातच संपवलं, मारेकरी फरार
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाचे महत्त्व
किशोर कदम यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा हस्तक्षेप हे शासनाच्या पुनर्विकास प्रक्रियेत नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याची महत्त्वाची पावले आहेत. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना होऊ शकतात.