150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 हजार मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा

150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 हजार मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा

MLA Uttam Jankar on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले. जे नेते कधीच पराभूत होऊ शकत नाहीत अशा नेत्यांना थेट घरी बसावं लागलं. या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळलं. यानंतर आता त्यांनी थेट अजित पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते असा धक्कादायक आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंच नाव घेत उत्तम जानकरांचा मोठा आरोप; म्हणाले, वाल्मिक कराडांचा करता करविता 

आमदार उत्तम जानकर यांनी आज बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. जानकर पुढे म्हणाले, ज्या बूथवर मला 31 मते मिळाली तेथील लोकांनी 400 मते दाखवली आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. जवळजवळ 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही बारामती मतदारसंघात 20 हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते.

अजित पवार यांनी 1 लाख 80 हजार मते मिळाली आहेत. त्यापैकी दोनास एक सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80 हजार अधिक 60 अशी एक लाख 40 हजार मते मिळाली असून अजित पवारांना 1 लाख 20 हजार मते उरतात, असे गणित उत्तर जानकर यांनी मांडले. ईव्हीएममध्ये गडबड होत असून याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहोत. दिल्लीमध्ये शरद पवार आणि राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. माळाशिरसमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे, तिथे पोटनिवडणूक घ्यावी. ही लढाई आम्ही लढणार आहोत. 4 महिन्यांत सरकार जमीनदोस्त होईल असा इशारा जानकर यांनी यावेळी दिला.

पंढरपुरच्या घोड्यासारखाच तुमचा परतीचा प्रवास; उत्तम जानकरांनी आमदार मानेंना धुतलंच

बीड मस्साजोय येथील प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे, अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. कुटुंबासोबत भेट घेतली आहे. तिथे असणाऱ्या दोनशे तीनशे लोकांसोबत मी बोललो. त्या ठिकाणच्या परिस्थितीची मी माहिती घेतली. बीडमध्ये अतिशय भयानक गुंडाराज आहे. जवळपास दोन ते अडीच हजार रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे, कोणी एखादा टिप्पर वाला असेल त्याचा उद्घाटन करायचा असेल तर हवेत गोळीबार केले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तर तरी गोळ्या झाडल्या जातात, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे असं जानकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube