Kulswamini Bhairi Bhavani Chaitra Navratri : चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला ( Chaitra Navratri ) विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव ९ एप्रिलला साजरा होणार आहे. या नवरात्रौत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या पत्नी साक्षी सुशांत शेलार ( Sushant and sakshi shelar ) यांच्या विद्यमाने लोअर परेलमध्ये प्रथमच ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.
Pune Lok Sabha: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उद्योजक पुनीत बालन यांची ‘युवा’ ताकद !
९ ते १८ एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू मार्चन, देवीचा गोंधळ, जागरण, महिला पुरोहितांचे पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत १४ एप्रिलला प्राथमिक कर्करोग चिकित्सा शिबिराचे आयोजन सकाळी १०.०० ते २.०० यावेळेत करण्यात आले आहे. वेशभूषा, महिला क्रीडा स्पर्धा यांचे विशेष आयोजन ही या उत्सवा दरम्यान करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातलं सर्वांत मोठं वसुली सरकार; फडणवीसांची सडकून टीका
लोअर परेल उड्डाण पूलाखाली जे हसन बिल्डिंग मध्ये रंगणारा हा चैत्रोत्सव आमच्यासाठी आत्मिक समाधान आणि आनंद देणारा असेल, असा विश्वास व्यक्त करीत आयोजिका साक्षी सुशांत शेलार यांनी या चैत्रोत्सवाचा लाभ सर्वांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन केले आहे.